-
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट २५ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
ट्रेलरपासूनच या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु होती. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
मुंबईतील कामाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
आलियाच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक देखील होत आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
आलिया भट्टने गंगुबाई साकारण्यासाठी तब्बल २० करोड रुपये घेतले आहेत. (फोटो : आलिया भट्ट / इन्स्टाग्राम )
-
‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटात अभिनेता अजय देवगणने रहीम लाला हे पात्र साकारले आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
या चित्रपटासाठी त्याने ११ करोड रुपये इतकं मानधन घेतलं आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
अभिनेता विजय राज ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटात तृतीयपंथी राझीबाईच्या भूमिकेत आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
हे पात्र साकारण्यासाठी त्याने दीड करोड रुपये घेतले असल्याची माहिती आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
चित्रपटात आलिया भट्टसोबत अभिनेता शांतनू माहेश्वरी स्क्रीनवर रोमान्स करताना दिसत आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटातून शांतनूने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. (फोटो : शांतनु माहेश्वरी/ इन्स्टाग्राम)
-
या चित्रपटासाठी त्याने ५० लाख रुपये मानधन घेतलं आहे. (फोटो : शांतनु माहेश्वरी/ इन्स्टाग्राम)
-
प्रसिद्ध अभिनेत्री सीमा पाहवा चित्रपटात साहाय्यक भूमिकेत असून त्यांनी २० लाख रुपये इतकं मानधन घेतलं आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
‘गॅंग ऑफ वासेपूर’ फेम अभिनेत्री हुमा कुरेशी देखील ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटात झळकली आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
-
यासाठी तिने दोन करोड रुपये इतकं मानधन घेतलं आहे. (फोटो : इंडियन एक्सप्रेस)
Photos : आलिया भट्ट ते हुमा कुरेशी….’गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलेल्या मानधनाचा आकडा पाहून थक्क व्हाल!
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट २५ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. ट्रेलरपासूनच या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु होती.
Web Title: From alia bhatt to ajay devgn know about how much fees actors took for sanjay leela bhansali bollywood movie gangubai kathiawadi kak