-
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला झुंड हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. गेल्या ४ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आहे. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
-
‘झुंड’ या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाची कथा अनेक प्रेक्षकांना आवडली आहे. या चित्रपटाचे अनेक चित्रपट समीक्षक आणि कलाकार कौतुक करताना दिसत आहे.
-
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला, त्यावेळी या चित्रपटाची कमाई संथगतीने सुरु होती. मात्र आता या चित्रपटाच्या कमाईमध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे.
-
नुकतंच या चित्रपटाच्या सहाव्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. यानुसार या चित्रपटाने आतापर्यंत १० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
-
अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज १ कोटींहून अधिक कमाई करत आहे.
-
या चित्रपटाने मंगळवारी साधारण १.३० कोटी रुपयांच्या आसपास कमाई केली आहे. तर बुधवारी म्हणजेच सहाव्या दिवशी या चित्रपटाने सुमारे १ कोटी कमावले आहेत.
-
त्यामुळे झुंड चित्रपटाची गेल्या सहा दिवसांची एकूण कमाई आता जवळपास १० कोटी रुपयांच्या जवळ पोहोचली आहे.
-
‘झुंड’ या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात ६.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १.५० कोटींची कमाई केली होती.
-
त्यानंतर शनिवारी २. १० कोटी आणि रविवारी २.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे तीन दिवसात या चित्रपटाने जवळपास ६.५० कोटींची कमाई केली होती.
-
या चित्रपटाची सुरुवातीची कमाई कमी झाल्याने त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
-
‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले आहे.
-
‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे दिसत आहे.
‘झुंड’ चित्रपटाच्या कमाईत घसघशीत वाढ, सहा दिवसात कमावले इतके कोटी
या चित्रपटाच्या कमाईमध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे.
Web Title: Jhund box office day 6 amitabh bachchan starrer hits 10 crores mark nrp