-
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेले दोन कलाकार म्हणजे आर्ची आणि परश्या.
-
‘झुंड’ या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
-
आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू आणि परश्या ही भूमिका साकारणारा आकाश ठोसर हे दोघेही कायमच चर्चेत असतात.
-
गेल्या काही दिवसांपासून रिंकू आणि आकाश हा ‘झुंड’ चित्रपटाच्या प्रमोशनासाठी सतत एकत्र दिसून येतात.
-
नुकतंच रिंकूने त्यांच्या प्रमोशनदरम्यानचे आकाशसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
रिंकू आणि आकाशने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे.
-
या फोटोच्या कॅप्शनमुळे अनेकांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले आहे. तिच्या या कॅप्शनची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
-
“प्रत्येक फोटोमध्ये माझे हावभाव वेगळे आहेत आणि या मुलाचे मात्र सारखेच…”, असे रिंकूने आकाशसोबतचे फोटो शेअर करताना म्हटले आहे.
-
तर आकाशने हे फोटो शेअर करताना म्हटले की, “तुमचे हास्य जगासोबत शेअर करा. हे मैत्री आणि शांतीचे प्रतीक आहे.”
-
रिंकू आणि आकाशच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहेत.
“प्रत्येक फोटोमध्ये…”, रिंकू राजगुरुने आकाश ठोसरबद्दल शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
या फोटोच्या कॅप्शनमुळे अनेकांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले आहे.
Web Title: Rinku rajguru shares pictures with akash thosar on instagram nrp