-
ऐश्वर्या राय पासून अनुष्का शर्मा आणि ईशा देओल पर्यंत, अर्जुन कपूर ते रणबीर कपूर आणि कार्तिक आर्यन यांना त्यांच्या घरामध्ये त्यांच्या खऱ्या नावाने नाही तर टोपण नावाने बोलावले जाते. चला तर मग जाणून घेऊया, कोणत्या कलाकाराचे टोपणनाव काय आहे.
-
रणबीर कपूरला आई नितू कपूर रेमंड नावाने आवाज देते.
-
सोनमला वडील अनिल कपूर आणि आई जिराफ नावाने हाक मारतात.
-
अनुष्का शर्माचे नाव ‘नुष्केश्वर’ होते. ती मोठी झाल्यावर तिचं नाव लहान करून ‘नुष्की’ असे ठेवण्यात आलं. विराट कोहली अनुष्काला याच नावाने हाक मारतो.
-
कार्तिक आर्यनला घरात ‘कोकी’ नावाने हाक मारली जाते. सिंधी भाषेत या शब्दाचा अर्थ ‘पराठा’ असा होतो.
-
अर्जून कपूरचं टोपणनाव फुबी आहे.
-
प्रियांका चोप्राला तिचे जगभरातील चाहते प्रेमाने ‘पीकी’ आणि ‘पिगी चॉप्स’ म्हणतात, परंतु तिचे वडील तिला ‘मिठू’ म्हणायचे. मात्र, घरातील बाकीचे लोक तिला मिमी म्हणून हाक मारतात.
-
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र ईशा देओलला बिट्टू नावाने हाक मारतात.
-
ऐश्वर्याला तिची आई गुल्लू नावाने हाक मारते.(फोटो – सोशल मीडिया)
Photos: रणबीर कपूर रेमंड तर अनुष्का नुष्की; ‘या’ कलाकारांचे Nicknames माहितीये का?
चला तर जाणून घेऊया, कोणत्या कलाकाराचे टोपणनाव काय आहे.
Web Title: Ranbir kapoor esha deol aishwarya rai anushka sharma karti aryan priyanka chopra arjun kapoor sonam kapoor nicknames hrc