• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. do not think she would have survived it salman khan comment on aishwarya rai hitting allegation he reacted nrp

ऐश्वर्या रायच्या थोबाडीत मारल्याच्या आरोपावर सलमान खानने सोडलं मौन, म्हणाला “जर ती…”

नोव्हेंबर २००१ मध्ये सलमानने ऐश्वर्याच्या राहत्या घरासमोर प्रचंड गोंधळ घातला होता.

April 9, 2022 12:18 IST
Follow Us
  • बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या राय यांची प्रेमकहाणी ही आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. बॉलिवूडमध्ये एकेकाळी गाजलेली जोडी म्हणून आजही लोक त्यांना ओळखतात.
    1/13

    बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या राय यांची प्रेमकहाणी ही आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. बॉलिवूडमध्ये एकेकाळी गाजलेली जोडी म्हणून आजही लोक त्यांना ओळखतात.

  • 2/13

    २००२ मध्ये सलमान आणि ऐश्वर्या रिलेशनशिपमध्ये होते. संजय भन्साळी दिग्दर्शित ‘दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते रिलेशनशिपमध्ये आले.

  • 3/13

    पण अवघ्या दोन वर्षातच त्या दोघांचे ब्रेकअप झाले. त्यावेळी त्यांचे रिलेशनशिप आणि ब्रेकअप हे बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असलेली बातमी ठरली होती.

  • 4/13

    सलमान आणि ऐश्वर्याच्या ब्रेकअपच्या बातमीमुळे अनेकांना धक्का बसला होता.

  • 5/13

    सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याने अनेकदा मुलाखतीत त्याच्यावर विविध आरोप केले होते. मात्र सलमानने यावर कधीही उत्तर दिले नाही.

  • 6/13

    “२००२ मध्ये सलमानने मारहाण केल्याचा आरोप केला होता. तो माझ्या अत्यंत घाणेरड्या पद्धतीने बोलायचा”, असेही ऐश्वर्या त्यावेळी म्हणाली होती.

  • 7/13

    “तो माझ्यावर प्रचंड संशय घ्यायचा. माझे इतर सहकलाकारांसोबत अफेअर असल्याचा संशय त्याला होता”, असेही तिने म्हटले होते.

  • 8/13

    सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्यात २००१ पासूनच फूट पडण्यास सुरुवात झाली. नोव्हेंबर २००१ मध्ये एकदा सलमानने ऐश्वर्याच्या राहत्या घरासमोर प्रचंड गोंधळ घातला होता.

  • 9/13

    सलमान त्यावेळी प्रचंड संतापला होता. तो रागात तिच्या घराचा दरवाजा वाजवत होता. सलमानने केलेल्या गैरवर्तनामुळे तिच्या आई-वडिलांनी तिला सलमानला भेटण्यापासून रोखले होते. ऐश्वर्याचे वडील कृष्णराज यांनी सलमान विरोधात पोलिस तक्रार देखील केली होती.

  • 10/13

    ऐश्वर्याने लावलेल्या या आरोपांवर सलमानने कधीही उत्तर दिले नाही. मात्र एकदा एका मुलाखतीत त्याने मौन सोडत यावर वक्तव्य केले होते.

  • 11/13

    ‘तू कधी कुठल्याही महिलेवर हात उचलला आहेस का?’ असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला “आता जर ती महिला म्हणाली मी तसे केले आहे, तर असावे.”

  • 12/13

    “म्हणजे समजा एकदा एका पत्रकाराने मला हा प्रश्न विचारला आणि त्यावेळी मला जर राग आला आणि मी टेबलावर जोरात हात आदळला. त्यावेळी तो टेबल तुटला होता”, असे सलमानने म्हटले.

  • 13/13

    “माझा सांगण्याचा अर्थ एवढाच की जर मी भांडण करत असेन, रागात असेन किंवा कोणाला मारण्यासाठी जात असेल तर मी त्यावेळी सर्वोत्कृष्ट वागेन. पण मला वाटत नाही की ती ते हाताळू शकेल. त्यामुळे ते खरे नाही”, असेही सलमानने सांगितले.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमराठी बातम्याMarathi News

Web Title: Do not think she would have survived it salman khan comment on aishwarya rai hitting allegation he reacted nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.