• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood couple ranbir kapoor and alia bhatt wedding have a look on their romantic love story photos kak

Photos : क्रश, बॉयफ्रेण्ड अन्…; एकदम फिल्मी आहे आलिया-रणबीरची हटके लव्हस्टोरी

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट १७ एप्रिलला विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.

Updated: April 11, 2022 14:57 IST
Follow Us
  • बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची जोडी.
    1/21

    बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची जोडी.

  • 2/21

    गेल्या काही दिवसांपासून आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत.

  • 3/21

    येत्या १७ एप्रिलला ते दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे.

  • 4/21

    मुंबईतील ‘आरके हाऊस’मध्ये आलिया आणि रणबीर सप्तपदी घेणार असून १३ एप्रिलपासून लग्नाच्या विविध सोहळ्यांना सुरुवात होणार आहे.

  • 5/21

    कुटुंबीय आणि नातेवाईक या विवाहसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

  • 6/21

    आलिया आणि रणबीर गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

  • 7/21

    बॉलिवूडमधील या प्रसिद्ध जोडीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. चाहते प्रेमाने या जोडीला ‘रालिया’ असं म्हणतात.

  • 8/21

    आलिया ११ वर्षांची असल्यापासूनच रणबीर कपूर तिला आवडत असल्याचं तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.

  • 9/21

    दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेली असताना पहिल्यांदा आलियाने रणबीरला पाहिले.

  • 10/21

    तेव्हा रणबीर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता.

  • 11/21

    ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमादरम्यान आलियाने रणबीर सोबत लग्न करण्याची इच्छा देखील बोलून दाखविली होती.

  • 12/21

    २०१२ साली ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

  • 13/21

    त्यानंतर रणबीर आणि आलिया पार्टी, कार्यक्रमादरम्यान एकमेकांना भेटू लागले.

  • 14/21

    अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं होतं.

  • 15/21

    त्यामुळे हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या.

  • 16/21

    बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या लग्न सोहळ्यात आलिया आणि रणबीर जोडीने हजेरी लावल्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

  • 17/21

    नंतर ते दोघेही कौटुंबिक कार्यक्रम, डिनर, पार्टीमध्ये एकत्र दिसू लागले.

  • 18/21

    अनेक वर्ष एकमेकांसोबत वेळ घालवल्यानंतर आलियाने गेल्याच वर्षी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून रणबीरसाठी खास पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती.

  • 19/21

    यावरून ते दोघेही एकमेकांच्या अखंड प्रेमात असल्याचं समजल्यानंतर चाहते देखील खुश झाले होते.

  • 20/21

    आता आलिया आणि रणबीर लग्नाच्या बेडीत अडकून त्यांच्या पुढील आयुष्याची नवी सुरुवात करणार आहेत.

  • 21/21

    (सर्व फोटो :इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
आलिया भट्टAlia BhattबॉलिवूडBollywoodबॉलिवूड न्यूजBollywood Newsरणबीर कपूरRanbir Kapoor

Web Title: Bollywood couple ranbir kapoor and alia bhatt wedding have a look on their romantic love story photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.