-
बॉलिवूड अभिनेते सतीश कौशिक हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन आणि लेखन क्षेत्रातही आपले कौशल्य दाखवले आहे.
-
अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेल्या सतीश कौशिक यांनी एकदा लग्नाशिवाय प्रेग्नेंट असलेल्या अभिनेत्रीला मैत्रीच्या नात्याने मदत करत लग्नाची मागणी घातली होती.
-
ती अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री नीना गुप्ता आहेत.
-
नीना गुप्ता आणि सतीश कौशिक हे चांगले मित्र आहेत. दोघांनी बऱ्याच चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे.
-
नीना गुप्ता वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबत लिव्ह-इनमध्ये राहत होत्या. दोघांनी लग्न केले नाही पण नीना गरोदर राहिल्या.
-
त्यानंतर नीना यांनी ठरवलं की त्या बाळाला जन्म देणार. या निर्णयामुळे त्या बराचकाळ तणावात राहिल्या होत्या.
-
सतीश कौशिक यांनी या विषयी एका मुलाखतीत सांगितले होते की, नीना प्रेग्नेंट असताना, त्यांनी नीना यांना लग्नाची मागणी घातली होती.
-
सतीश यांच्या म्हणण्यानुसार, ते नीना यांना म्हणाले, “काळजी करू नकोस, जर बाळाचा रंग जर सावळा असेल तर सांग की ते बाळ माझं आहे आणि आपण लग्न करू. कुणाला शंका येणार नाही.”
-
‘बॉम्बे टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सतीश कौशिक म्हणाले होते, “एक मित्र म्हणून मी फक्त माझं प्रेम व्यक्त केलं होतं. मी तिच्यासाठी चिंतेत होतो. मला तिला एकटं पडू द्यायचं नव्हतं.”
-
पुढे सतीश कौशिक म्हणाले, “तिने पुस्तकात म्हंटलंय मी तिला प्रपोज केलं. मात्र ती मिक्स फिलिंग होती. ती मस्करी होती, काळजी होती तिचा सन्मान होता. मी माझ्या बेस्ट फ्रेण्डला तिला माझी गरज असताना सपोर्ट केला.” असं म्हणत सतीश कौशिक यांनी नीना गुप्ता आणि त्यांचा मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला होता.”
-
दरम्यान, १९७५ पासून नीना आणि सतीश कौशिक एक मित्र होते. ते दोघे करोलबागमध्ये एकाच परिसरात राहत होते. दिल्ली विद्यापीठात त्या दोघांनी एकत्र शिक्षण घेतलंय.
-
नीना यांना एक मुलगी असून तिचं नाव मसाबा आहे. मसाबा एक फॅशन डिझायनर आहे.
लग्न न करता प्रेग्नेंट असलेल्या ‘या’ अभिनेत्रीला सतीश कौशिक यांनी घातली होती लग्नाची मागणी
Web Title: When satish kaushik offered to marry pregnant actress neena gupta without marriage and divorce dcp