-
दाक्षिणात्य अभिनेता यश मुख्य भूमिकेत असलेला ‘केजीएफ २’ हा चित्रपट १४ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला.
-
२०१८ साली आलेल्या ‘केजीएफ’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.
-
पहिल्याच दिवशी ‘केजीएफ २’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १६५ कोटींची कमाई केली.
-
हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्डस् मोडणार असल्याची चर्चा चित्रपटाच्या ट्रेलरपासूनच सुरु झाली होती.
-
‘केजीएफ २’ चित्रपटाची स्टार कास्टही तगडी आहे.
-
रॉकिंग स्टार यश या चित्रपटात ‘रॉकी भाई’ या मुख्य भूमिकेत आहे.
-
‘केजीएफ’ चित्रपटात रॉकी भाईची कहाणी सांगणाऱ्या विजेंद्र इंगलागी ही भूमिका अभिनेता आनंत नाग यांनी साकारली होती.
-
‘केजीएफ २’ मध्ये मात्र ही भूमिका अभिनेता प्रकाश राज यांनी साकारली आहे. तर आनंत नाग या चित्रपटात आनंद इंगलागी या भूमिकेत आहेत.
-
मीडिया रिपोर्टनुसार, प्रकाश राज यांनी ही भूमिका साकारण्यासाठी ८० लाख रुपये मानधन घेतले आहे.
-
तर आनंत नाग यांनी चित्रपटासाठी ५० लाख रुपये मानधन घेतल्याची माहिती आहे. (फोटो : आयएमडीबी)
-
बॉलिवूड कलाकारांनीही या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
-
अभिनेता संजय दत्त या चित्रपटात ‘अधिरा’ या खलनायिकाच्या भूमिकेत आहे.
-
‘केजीएफ २’ चित्रपटासाठी त्याने ९ कोटी रुपये मानधन घेतले आहे.
-
लोकप्रिय अभिनेत्री रवीना टंडनने या चित्रपटात देशाच्या पंतप्रधानांची भूमिका साकारली आहे.
-
हे पात्र साकारण्यासाठी रवीनाने दीड करोड रुपये घेतल्याची माहिती आहे.
-
दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी ‘केजीएफ २’ मध्ये रॉकी भाईच्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत आहे.
-
या चित्रपटासाठी तिने तीन कोटी रुपये मानधन घेतले आहे.
-
‘केजीएफ २’ चित्रपटासाठी यशची भूमिका अभिनयापलीकडे देखील महत्त्वाची मानली जात आहे.
-
मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटातील ‘रॉकी भाई’ साकारण्यासाठी यशने तब्बल २५-३० कोटी रुपये मानधन घेतले आहे.
-
एवढंच नाही तर ‘केजीएफ २’ चित्रपटाच्या कमाईतील काही टक्के रक्कम देखील यशला मिळणार आहे.
-
(सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस)
Photos : रॉकिंग स्टार यश ते संजय दत्त…’KGF 2′ चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलेल्या मानधनाचा आकडा पाहून थक्क व्हाल
दाक्षिणात्य अभिनेता यश मुख्य भूमिकेत असलेला ‘केजीएफ २’ हा चित्रपट १४ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.
Web Title: Kgf chapter 2 movie cast rocking star yash bollywood actress raveena tandon actor sanjay dutt whopping fees photos kak