-
स्टार प्रवाहवर २ मे पासून सुरु होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
-
मालिकेच्या प्रोमोना भरभरुन प्रतिसाद मिळत असून प्रोमोमध्ये दिसणारे लोकेशन्स सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
-
‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेसाठी रिअल लोकेशनचा वापर करण्यात येतोय.
-
या मालिकेचं कथानक नागपूरमधील एका गावात घडतं.
-
त्यामुळे शूटसाठी खऱ्या गावाची निवड करण्यात आली आहे.
-
मालिकेत दिसणारी घरं, आजूबाजूचा परिसर आणि विशेष म्हणजे गावकरी हे सगळं खरंखुरं असून वास्तवादी चित्रण करण्यासाठी संपूर्ण टीम मेहनत घेत आहे.
-
अभिनेत्री उर्मिला कोठारेला याआधी आपण ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे.
-
मात्र या मालिकेत ती नो मेकअप लूकमध्ये दिसणार आहे.
-
अत्यंत हालाखिच्या परिस्थितीत आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी झगडणारी आई उर्मिला या मालिकेत साकारते आहे.
-
साधी साडी आणि वेणी अश्या नॉन ग्लॅमरस रुपात उर्मिला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
-
रणरणत्या उन्हात शूट करताना उर्मिलाची कसोटी लागतेय.
-
भूमिकेला पुरेपुर न्याय देण्यासाठी उर्मिलाने कंबर कसली आहे.
-
‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतून उर्मिला जवळपास १२ वर्षांनंतर टीव्ही विश्वात पुनरागमन करणार आहे.
-
गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : उर्मिला कोठारे / इन्स्टाग्राम)
Photos: ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेसाठी उर्मिलाचा नो मेकअप लूक, रणरणत्या उन्हात गावात शूटिंग
Web Title: Star pravah tujhech mi geet gaat aahe tv serial actress urmila kothare no makeup look shooting in village photos information sdn