• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. zee marathi tv show tu tevha tashi radha fame actress roomani khare daughter of sandeep khare information photos sdn

Photos: ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतील ‘राधा’ आहे प्रसिद्ध कलाकाराची मुलगी; जाणून घ्या काही खास गोष्टी

April 26, 2022 10:08 IST
Follow Us
  • Roomani Khare Tu Tevha Tashi
    1/18

    झी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे.

  • 2/18

    या मालिकेतील व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात.

  • 3/18

    या मालिकेतील एक व्यक्तिरेखा जी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय ती म्हणजे अनामिकाची मुलगी राधा.

  • 4/18

    राधाची व्यक्तिरेखा प्रसिद्ध कवी संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे साकारतेय.

  • 5/18

    रुमानीची ही पहिलीच मालिका आहे.

  • 6/18

    राधा या भूमिकेबद्दल रुमानीसोबत साधलेला हा खास संवाद…

  • 7/18

    १. ही भूमिका तुला कशी मिळाली?
    – ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत राधा या भूमिकेसाठी कुठल्याही कलाकाराची निवड झाली नसल्याचं मला कळलं.

  • 8/18

    ऑडिशन सुरु आहे हे कळताच मी या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं आणि त्यानंतर माझं सिलेक्शन झालं आणि माझा राधा म्हणून या मालिकेतील प्रवासाला सुरुवात झाली.

  • 9/18

    २. ही तुझी टीव्ही मालिकेतील प्रथमच भूमिका आहे, त्याबद्दल काय सांगशील?
    – माझी पहिलीच टीव्ही मालिकेतील भूमिका ती पण राधासारखी बोल्ड आणि बिनधास्त भूमिका माझ्या वाट्याला आली याचा मला आनंद आहे.

  • 10/18

    राधा सध्याच्या टीनएजर्सचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे मला ती साकारताना जास्त जवळची वाटते.

  • 11/18

    ३. तुला अभिनयाची गोडी कशी लागली? मालिकेच्या तुझ्यासोबत अनेक दिग्गज कलाकार आहेत, त्यांच्याकडून किती शिकायला मिळतं?
    – अभिनयाची गोडी मला आधीपासूनच होती आणि म्हणूनच एसपी कॉलेजमध्ये शिकताना मी एकांकिका आणि लघुपटांमध्ये सहभागी व्हायला सुरुवात केली.

  • 12/18

    मालिकेची निर्मिती संस्था, दिग्दर्शक आणि अनुभवी सहकलाकार यांच्याकडून खूप शिकायला मिळतंय.

  • 13/18

    ४. वडील कलाक्षेत्रात असल्यामुळे तुला त्यांच्या अनुभवाचा फायदा झाला का?
    – लोकांशी कसं जुळवून घ्यावं, मीडियाला कसं सामोरं जावं, काम निवडताना काय विचार करावा हे सगळं करताना मी बाबांना लहानपणापासून बघत आलेय.

  • 14/18

    मनोरंजन क्षेत्राशी संबंधित पालक असतील तर त्या क्षेत्राची करियर म्हणून निवड केली की नक्की मदत होते.

  • 15/18

    या क्षेत्रातील समस्या, कामाची आणि उत्पन्नाची अनिश्चितता, कधी-कधी काही प्रोजेक्ट्स अर्धवट गुंडाळणं या सगळ्याला सामोरं कसं जायचं याचे धडे घरातच मिळतात.

  • 16/18

    आई-वडील कलाकार असतील तर त्यांचे अनुभव, संपर्क वापरून होणारे उपयोग आणि गैरफायदे यात एक पुसटशी रेष आहे. ती तुम्हाला ओळखता यायला हवी.

  • 17/18

    अभिनयासोबतच रुमानीला डान्सचीही फार आवड आहे.

  • 18/18

    (सर्व फोटो सौजन्य : रुमानी खरे / इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment NewsमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Zee marathi tv show tu tevha tashi radha fame actress roomani khare daughter of sandeep khare information photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.