-
विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरताना दिसत आहे.
-
या चित्रपटातील गाणी, पोस्टर, ट्रेलर, टिझर सर्वच चर्चेचा विषय ठरत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-
अनेक समीक्षक, कलाकार या चित्रपटाची स्तुती करताना दिसत आहेत.
-
चंद्रमुखी हा चित्रपट गेल्या २९ एप्रिलला प्रदर्शित झाला. नुकतंच या चित्रपटाच्या पाच दिवसांचे बॉक्स ऑफिसचे कलेक्शन समोर आले आहे.
-
अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांची प्रमुख भूमिका असलेला चंद्रमुखी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक वेगळीच जादू निर्माण केली आहे.
-
चंद्रमुखी हा चित्रपट प्रदर्शित होऊन सात दिवस उलटले आहेत. या चित्रपटाने मुंबई आणि महाराष्ट्रासह देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहे.
-
पहिल्या दिवसांपासूनच हा चित्रपट हाऊसफुल्ल असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे.
-
प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १.२१ कोटींची कमाई केली होती.
-
त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी ३० एप्रिलला या चित्रपटाने १.३२ कोटींचा गल्ला जमवला.
-
यानंतर रविवारीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १.०९ कोटींची कमाई केली आहे.
-
मात्र चंद्रमुखी या चित्रपटाच्या कमाईत सोमवार २ मेपासून काहीशी घट पाहायला मिळाली.
-
या चित्रपटाने सोमवारी २ मे रोजी ८० लाखांची कमाई केली आहे. तर पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी या चित्रपटाने ९८ लाखांची कमाई केली आहे.
-
त्यामुळे गेल्या पाच दिवसात या चित्रपटाने जवळपास ६.२१ कोटींचा गल्ला जमवला आहे.
-
सध्या या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-
तसेच हा चित्रपट मराठी चित्रपटाच्या यशातील एक महत्वाचा चित्रपट ठरताना दिसत आहे.
-
जागतिक पातळीवरही हा चित्रपट सुपरहिट ठरताना दिसत आहे.
-
‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर याचे आहे.
-
या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसत आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर पाहायला मिळत आहे.
-
आपल्या मोहमयी नजाकतीने अमृताने या चित्रपटातील लावण्यांद्वारे सर्वांचीच मने जिंकली आहे. याला अजय -अतुल यांच्या दमदार संगीताची साथ लाभली आहे.
‘चंद्रमुखी’ चित्रपटाच्या कमाईत घसघशीत वाढ, पाच दिवसात कमावले इतके कोटी
नुकतंच या चित्रपटाच्या पाच दिवसांचे बॉक्स ऑफिसचे कलेक्शन समोर आले आहे.
Web Title: Prasad oak directorial amruta khanvilkar and adinath kothare starrer chandramukhi movie day 5 box office collection nrp