-
अभिनेता प्रसाद ओकची मुख्य भूमिका असणारा ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट १३ जून रोजी प्रदर्शित होत आहे.
-
याच निमित्ताने तो लोकसत्ताच्या ‘डिजीटल अड्डा’च्या कट्ट्यावर चित्रपटाबद्दल गप्पा मारण्यासाठी आला होता.
-
या चित्रपटाबद्दल बोलताना महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाबद्दल विषय निघाला आणि त्याने अगदी मनमोकळेपणे या कार्यक्रमातील किस्से सांगितले.
-
यावेळी त्याला महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या निमित्ताने अमिताभ बच्चन यांची भेट घेतल्यानंतर तुला काय वाटले, असा प्रश्न विचारला.
-
या प्रश्नावर बोलताना प्रसाद म्हणाला, अमिताभ हे आपले सर्वात आवडते अभिनेते आहेत. त्यांना भेटणं ही माझ्यासाठी फॅन मोमेंट होती.
-
तसेच पुढे बोलताना प्रसाद म्हणाला, “आम्ही कलाकार तिथे पोहचण्याआधी अमिताभ बच्चन हे कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन मोटे, आणि सचिन गोस्वामी यांच्याशी बोलत होतो.”
-
त्यावेळी बिग बींनी हे समोर बसतात त्यांना (प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर) तुम्ही रिअॅक्शन लिहून देता ना?, तर त्यांनी नाही, नाही. ते त्यांच्या एक्सटेम्पो रिअॅक्शन असतात. काहीही लिहून दिलेलं नसतं असं सांगितलं.
-
“ते ऐकून अमिताभ बच्चन मला असं म्हणाले की, हे तुम्ही कसं बोलता. दर वेळेस नवी प्रतिक्रिया, त्यात पुन्हा पुन्हा तीच प्रतिक्रिया नाही, बरं त्यावरही त्या मजेशीर असतात. बोलताना सर्वांचा मान राखला जातो., असे त्यांनी म्हटले.
-
मी तुमच्या जागी असतो तर मला बोलता आलं नसतं. ही माझ्यासाठी फार मोठी कॉम्पिलमेंट होती,” असे प्रसादने सांगितले.
-
“माझ्यासाठी बच्चन साहेब हे देव आहेत. मी त्यांचा इतका मोठा फॅन होतो. त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया मिळणे म्हणजे स्वप्नवतच होते”, असेही त्याने सांगितले.
“मी तुमच्या जागी असतो तर मला हे बोलता आलं नसतं…”, प्रसाद ओकने सांगितला अमिताभ बच्चनसोबतच्या भेटीचा किस्सा
“माझ्यासाठी बच्चन साहेब हे देव आहेत. त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया मिळणे म्हणजे स्वप्नवतच होते”, असेही त्याने सांगितले.
Web Title: Prasad oak share the story of meeting with amitabh bachchan during maharashtra hasyajatra programme nrp