-
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’
-
जवळपास प्रत्येक घरात ही मालिका आवडीने पाहिली जाते.
-
मालिकेतील दयाबेन, टपू सेना, तारक मेहता, पोपटलाल, जेठालाल प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
-
२००८ सालापासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे .
-
अभिनेता शैलेश लोढा यांनी मालिकेतील ‘तारक मेहता’ हे पात्र घराघरात पोहोचवले.
-
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेमुळे शैलेश लोढा यांना लोकप्रियता मिळाली.
-
परंतु दयाबेन, टपू यांच्यानंतर आता शैलेश लोढादेखील यांनी देखील मालिका सोडली आहे.
-
शैलेश लोढा यांना दिलेल्या तारखांचा योग्य वापर न झाल्यामुळे त्यांनी हा शो सोडला असल्याचं वृत्त आहे.
-
तसेच मालिकेच्या करारामुळे ते नाराज असल्याचे देखील बोलले जात होते.
-
शिवाय, मालिकेमुळे त्यांना अनेक प्रकल्पही सोडावे लागले आहेत.
-
मात्र आता दुसरी संधी गमवायची नसल्यामुळे त्यांनी मालिकेला रामराम ठोकला आहे.
-
शैलेश लोढा यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.
-
शैलेश एक अभिनेता असून उत्तम कवी आणि लेखक देखील आहेत.
-
त्यांनी आजपर्यंत अनेक पुस्तके लिहिली आहेत.
-
अनेकदा शैलेश कवी संमेलनात देखील दिसून आले आहेत.
-
इथूनच त्यांच्या कलाविश्वातील करिअरला सुरुवात झाली.
-
मुळचे राजस्थानचे असलेले शैलेश लोढा यांनी सायन्स विषयात पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.
-
२००७ मध्ये त्यांनी ‘कॉमेडी सर्कस’ शोमध्ये सहभाग घेतला होता.
-
नंतर २००८ मध्ये त्यांना ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिका मिळाली.
-
जवळपास १४ वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर त्यांनी मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
-
मीडिया रिपोर्टनुसार, तारक मेहता साकारण्यासाठी शैलेश लोढा यांना एका एपिसोडसाठी १ लाख रुपये मानधन मिळायचे. (सर्व फोटो : शैलेश लोढा/ इन्स्टाग्राम)
Photos: ‘तारक मेहता’ साकारण्यासाठी शैलेश लोढा घ्यायचे इतके मानधन; ‘कॉमेडी सर्कस’ मधून केली होती करिअरला सुरुवात
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील ‘तारक मेहता’ हे पात्र अभिनेता शैलेश लोढा यांनी घराघरात पोहोचवले. परंतु १४ वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर त्यांनी मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
Web Title: Tarak mehta ka ooltah chashmah fame actor shailesh lodha quit the show know the fees he took for per episode photos kak