-
झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली.
-
या मालिकेतील सौरभ आणि अनामिकाची अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे.
-
या मालिकेतील हृदयस्पर्शी प्रसंग आणि संवाद देखील प्रेक्षकांना आवडत आहेत.
-
मे महिना म्हणजे उन्हाळा आणि या महिन्यात आगमन होते ते म्हणजे फळांचा राजा आंबा याचे.
-
आंबा म्हणजे सगळ्यांचा जीव की प्राण आणि याच हापूस आंब्यावर ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतील कलाकारांनी ताव मारला.
-
प्रेक्षकांना या मालिकेत हापूस पार्टी होताना पाहायला मिळणार आहे आणि इतकंच नव्हे तर अनामिकाकडे होणाऱ्या हापूस पार्टीमध्ये सौरभ रमा आजीला अनामिकावर असलेल्या त्याच्या प्रेमाची कबुली देखील देणार आहे आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा देखील व्यक्त करणार आहे.
-
सौरभ आता त्याच्या मनातील गोष्ट अनामिकाला सांगणार की नाही हे पाहणं महत्वाचं असेल.
-
हापूस प्रमाणेच गोड अशी सौरभ आणि अनामिकेच्या प्रेमाची सुरुवात होणार का? हे प्रेक्षकांना मालिकेत लवकरच पाहायला मिळेल.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
Photos: ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतील कलाकारांनी हापूस आंब्यावर मारला ताव; फोटो व्हायरल
या मालिकेतील सौरभ आणि अनामिकाची अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे.
Web Title: Zee marathi tv serial tu tevha tashi mango party swapnil joshi shilpa tulaskar abhidnya bhave photos viral sdn