• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. actor director karan johar fitness secrte and he loose 17 kg in 4 months kmd

Photos : करण जोहरने करुन दाखवलं, ४ महिन्यात घटवलं तब्बल १७ किलो वजन

दिग्दर्शक-अभिनेता करण जोहरचा आज ५०वा वाढदिवस. करणच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चढ-उतार आले. पण त्याने मागे कधीच वळून पाहिलं नाही. त्याचबरोबरीने वयाची पन्नाशी गाठली तरी त्याने आपल्या फिटनेसकडे अधिक लक्ष दिलं आणि अजूनही तो फिटनेसकडे आवर्जून लक्ष देतो. त्याचं फिटनेस सीक्रेट नेमकं काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत.

May 25, 2022 14:10 IST
Follow Us
  • बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा आज वाढदिवस. करणने आता वयाची पन्नाशी गाठली आहे.
    1/9

    बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा आज वाढदिवस. करणने आता वयाची पन्नाशी गाठली आहे.

  • 2/9

    करणने त्याच्या करिअरबरोबरच फिटनेसकडेही अधिकाधिक लक्ष दिलं.

  • 3/9

    आजही त्याच्या दिवसाची सुरुवात वर्कआऊटने होते. करिअरच्या सुरुवातीलाच करणचं वजन अधिक वाढलं होतं. मात्र याकडे त्याने दुर्लक्ष न करता अधिक मेहनत घेतली.

  • 4/9

    त्याने जवळपास ४ महिन्यात १७ किलो वजन घटवलं. त्यासाठी करणने दिवस-रात्र मेहनत घेतली.

  • 5/9

    २०१७मध्ये करणच्या लूकमध्ये बराच बदल जाणवला. त्याने फिटनेस ट्रेनर कुणाल गिरची वजन कमी करण्यासाठी मदत घेतली.

  • 6/9

    उत्तम डाएट प्लॅन फॉलो करायचं करणने ठरवलं. इतकंच नव्हे तर त्याच्या फिटनेस ट्रेनरने स्विमिंगमध्ये त्याची असलेली आवड पाहून त्याच्या वर्कआऊटचं वेळापत्रक तयार केलं.

  • 7/9

    करण स्विमिंग पूलमध्ये अधिक वर्कआऊट आणि वेट ट्रेनिंग करायचा. यामुळे त्याला अधिक फिट होण्यास मदत मिळाली.

  • 8/9

    त्याच्या डाएटमध्ये भाजी, अंडी, प्रोटिन आणि कार्ब्सयुक्त पदार्थांचा देखील समावेश होता. करण ज्या अंड्यांचं सेवन करायचा ते अंड देणाऱ्या कोंबडीचं देखील एक वेगळं डाएट होतं. ही खरंच मजेशीर गोष्ट आहे.

  • 9/9

    करणने आपल्या चेहऱ्याचा कायापालट करण्यासाठी कॉस्मॅटीक सर्जरीचा आधार घेतला. त्याने एका मुलाखतीमध्ये स्वतःच याबाबत सांगितलं होतं. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)

TOPICS
करण जोहरKaran JoharबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Actor director karan johar fitness secrte and he loose 17 kg in 4 months kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.