-
गेली १८ वर्ष महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील तमाम वहिनींचा पैठणीने सन्मान करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा एकमेव कार्यक्रम म्हणजे ‘होम मिनिस्टर’.
-
या कार्यक्रमाची आणि आदेश बांदेकर यांची लोकप्रियता अफाट आहे.
-
बांदेकर भाऊजी वहिनींच्या कुटुंबियांशी गप्पा मारत त्यांना आपलेस करतात.
-
त्यामुळे भाऊजींविषयी प्रेक्षकांना खूप जिव्हाळा आहे.
-
अशाच एका ९९ वर्षांच्या आजी या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाच्या चाहत्या आहेत.
-
‘होम मिनिस्टर’ लागल्यावर आदेश बांदेकर यांना पाहून ते समोर असल्याची कल्पना करुन गाणं म्हणणाऱ्या नलिनी जोशी या ९९ वर्षीय आजींची नुकतीच भाऊजींनी सांगलीत भेट घेतली.
-
निमित्त होते आजींच्या शंभर वर्षातील पदार्पण कार्यक्रमाचे.
-
यावेळी आदेश बांदेकर यांनासमोर पाहून आजीही अवाक् झाल्या.
-
आदेश बांदेकर यांनी आजींना पैठणी भेट देऊन त्यांचा सन्मान केला.
-
काही दिवसांपूर्वी आजीच्या गाण्याचा व्हिडीओ पाहून आदेश बांदेकर यांनी त्यांचे कौतुक करण्यासाठी सांगलीला येण्याचे आश्वासन दिले होते.
-
वय वर्ष ९९ असताना सुद्धा सांगलीच्या नलिनी जोशी यांनी गाण्याची गोडी जपली आहे.
-
नाट्यगीते भक्तिगीते, भावगीते जोशी आजी अतिशय सुरेल आवाजात म्हणून दाखवतात.
-
सांगलीतील या आजीबाईंचं अनोखं प्रेम पाहून आदेश बांदेकर यांनी थेट सांगली गाठत त्यांची भेट घेतली.
-
साक्षात आदेश बांदेकर यांना पाहून आजींना आश्चर्य वाटलंच, शिवाय त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य आणि समाधान झळकले.
-
दरम्यान, सांगलीतील नलिनी जोशी यांनी आज वयाची ९९ वर्षे पूर्ण करत १०० व्या वर्षात पदार्पण केले.
-
या कार्यक्रमाला आदेश बांदेकर यांनी उपस्थिती लावत त्यांना पैठणी भेट देत मनसोक्त गप्पाही मारल्या.
-
यावेळी बोलताना आदेश बांदेकर यांना त्यांच्या आईची आठवण आली आणि या आठवणीने बांदेकर यांचे डोळे पाणावल्याने संपूर्ण वातावरण गहिवरुन गेले.
-
सध्या ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमच महामिनिस्टर हे पर्व सुरु आहे आणि या परवाच्या विजेतील ११ लाखांची पैठणी मिळणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आदेश बांदेकर / इन्स्टाग्राम)
Photos: ‘होम मिनिस्टर’ ९९ वर्षांच्या आजींच्या भेटीला; आदेश बांदेकरांनी पैठणी देण्यासाठी गाठली सांगली
‘होम मिनिस्टर’ लागल्यावर आदेश बांदेकर यांना पाहून ते समोर असल्याची कल्पना करुन गाणं म्हणणाऱ्या नलिनी जोशी या ९९ वर्षीय आजींची नुकतीच भाऊजींनी सांगलीत भेट घेतली.
Web Title: Zee marathi home minister aadesh bandekar met 99 year old grand mother at sangli maharashtra gave paithani saree emotional moment photos sdn