-
सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येने पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे.
-
सिद्धू यांनी त्यांच्या कलेच्या जोरावर फक्त देशभरातच नव्हे तर परदेशातही नाव कमावलं.
-
काही सुपरहिट गाण्यांमुळे सिद्धू यांच्या करिअरला नवी दिशा मिळाली.
-
सो हाई (So High) हे सिद्धू यांचं गाणं प्रचंड हिट ठरलं. या गाण्याला ४८१ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले.
-
२०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या PBX1 अल्बममधील सिद्धू यांचं गाणंही प्रचंड हिट ठरलं.
-
बॅडफेला (Badfella) हे सिद्धू यांचं सुपरहिट गाणं टी-सीरिज अंतर्गत प्रदर्शित करण्यात आलं होतं. हे गाणं युट्यूबवर ९१ मिलियनपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं.
-
सेम बीफ (Same beef) हे सिद्धधू आणि बोहेमिया यांनी गायलेलं गाणं देखील सोशल मीडियावर प्रचंड हिट ठरलं होतं. ३९४ मिलियनपेक्षा अधिक लोकांनी या गाण्याला पसंती दर्शवली.
-
जस्ट लिसन (Just Listen) हे गाणं सिद्धू यांनी लिहिलं होतं आणि जानेवारी २०१८मध्ये त्यांनी ते प्रदर्शित केलं. १४४ मिलियनपेक्षा अधिक लोकांनी या गाण्याला पसंती दर्शवली होती.
-
आजही सिद्धू यांच्या गाण्याला प्रेक्षक भरभरुन प्रेम देतात. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
Sidhu Moosewala Top Songs : ‘या’ ५ सुपरहिट गाण्यांमुळे सिद्धू मूसेवाला यांचं बदललं नशिब
सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची सुरक्षाव्यवस्था राज्य सरकारने काढून घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी, रविवारी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात मूसेवाला यांचा मृत्यू झाला. सिद्धू यांनी त्यांच्या कलेच्या कलासृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. सिद्धू यांच्या सुपरहिट गाण्यांबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
Web Title: Five top songs of sidhu musewala that made him superstardom viral on social media kmd