-
बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं किती जवळचं आहे यामध्ये काही लपवण्यासारखं नाही. अनेकदा क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेत्रींमधील प्रेमप्रकरणं समोर आली आहेत. विराट कोहली-अनुष्का शर्मा, युवराज सिंग-हेजल, मन्सूर अली खान-शर्मिला टागोर अशा जोड्याही क्रिकेटविश्व आणि बॉलिवूडने दिल्या आहेत. पण यातील काही प्रेमप्रकरणं शेवटापर्यंत पोहोचलीत नाहीत. त्यातीलच एक जोडी म्हणजे सौरव गांगुली आणि नगमा…
-
२००० च्या काळात सध्या राजकारणात पूर्णपणे सक्रीय असणाऱ्या नगमा आणि सौरव गांगुली यांच्यातील प्रेमप्रकरण चांगलंच गाजलं होतं.
-
विशेष म्हणजे सौरव गांगुलीचं लग्न झाल्यानंतर या अफेअरची चर्चा सुरु झाली होती. सौरव गांगुली प्रसिद्ध डान्सर डोहा गांगुलीसोबत विवाहबंधनात अडकलेला होता.
-
या अफेअरसंबंधी नगमाने एकदा जाहीरपणे भाष्य केलं होतं. Savvy Magazine ला दिलेल्या मुलाखतीत नगमाने मौन सोडत सौरव गांगुलीसोबतच्या संबंधांवर मोकळेपणाने उत्तर दिलं होतं.
-
ती म्हणाली होती, “कोणी काहीही म्हणत असलं तरी कोणीही नकार दिलेला नाही. जोपर्यंत एकमेकांच्या जीवनात एकमेकांचे अस्तित्व नाकारले जात नाही तोपर्यंत कोणतीही व्यक्ती त्यांना हवे ते बोलू शकते”.
-
सौरव आणि नगमाची भेट १९९९ च्या वर्ल्ड कपदरम्यान झाली होती. यानंतर अनेकदा ते एकत्र दिसले होते. त्यांच्यातील वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरली होती.
-
डीएनएने आपल्या रिपोर्टमध्ये, ही जवळीक वाढल्याने गांगुलीच्या वैवाहिक जीवनाला फटका बसला होता. गांगुलीची पत्नी या सगळ्या प्रकारावर नाराज होती. पण सौरव आणि नगमाचं हे अफेअर जास्त काळ टिकू शकलं नाही आणि त्यांनी आपापला वेगळा मार्ग स्विकारला.
-
नगमाने आपल्या ब्रेकअपवरही भाष्य केलं होतं. ती म्हणाली होती “इतर गोष्टींसोबत करिअरही पणाला लागलं होतं. त्यामुळे वेगळं व्हावं लागलं”.
-
“अहंकार किंवा एकत्र राहण्याचा आग्रह याशिवाय इतर अनेक गोष्टींचं ओझं वाहून न्यायचं होतं,” असं नगमाने यावेळी सांगितलं होतं.
-
याच अफेअरमुळे गांगुलीच्या खराब खेळीसाठी अनेकदा क्रिकेट चाहत्यांनी नगमाला जबाबदार धरलं होतं.
-
“जेव्हा एखादी गोष्ट अती होते तेव्हा ती एकमेकांच्या हिताआड येते. मग हळूहळू तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंद आणणं अपेक्षित असताना दु:खही घेऊन येता. त्यामुळे पुढे जाणं हे हिताचं असतं,” असं नगमाने म्हटलं होतं.
-
दरम्यान २०२० मध्ये नगमाने सौरव गांगुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
PHOTOS: …जेव्हा नगमाने गांगुलीसोबतच्या अफेअरवर सोडलं होतं मौन; म्हणाली होती “अहंकार तसंच एकत्र राहण्याचा…”
सौरव आणि नगमाची भेट १९९९ च्या वर्ल्ड कपदरम्यान झाली होती. यानंतर अनेकदा ते एकत्र दिसले होते. त्यांच्यातील वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरली होती.
Web Title: When nagma broke silence on her alleged affair with sourav ganguly and their break up sgy