-
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच केके यांचं ३१ मे रोजी रात्री निधन झालं आहे.
-
कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरमध्ये अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
-
रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच त्यांचं निधन झालं. ते ५३ वर्षांचे होते.
-
केके यांनी त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने आजवर जवळपास ५०० गाणी गाऊन रसिकांचं मनोरंजन केलं.
-
त्यांचं असं अचानक जाणं हा चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे.
-
९०च्या दशकात केके यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं.
-
केके यांच्या कॉन्सर्टला चाहते गर्दी करायचे.
-
‘हम रहे या ना रहे कल’ हे त्यांचं कॉन्सर्टमध्ये गायलेलं शेवटचं गाणं ठरलं.
-
हे गाणं ९०च्या दशकातील कॉलेजमधील तरुणाईच्या ओठांवर असायचं.
-
‘यारों ये दोस्ती बडी हि हसीन है’ हे केके यांच्या मैत्रीवर आधारित असणाऱ्या गाण्याने प्रत्येकाच्याच मनात घरं केलं होतं.
-
‘हम दिल दे चुके सनम’ या बॉलिवूड चित्रपटातील ‘तडप तडप के इस दिल’ हे गाणं प्रचंड गाजलं होतं.
-
ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणंदेखील केके यांनीच गायलं होतं.
-
बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू यांच्या ‘जिस्म’ या चित्रपटातील ‘आवारापन बंजारापन’ हे केके यांचं गाणं आजही अनेकांचं आवडतं गाणं आहे.
-
‘तू आशिकी है’ हे गाणं आजही तरुणाईच्या ओठांवर असतं.
-
‘गॅंगस्टर’ चित्रपटातील ‘तू ही मेरी शब है’ हे प्रेमावरील गाणं अनेकांच्या स्टेटसला आजही असतं.
-
केके यांचं ‘मेरा पहेला पहेला प्यार’ हे रोमॅंटिक गाणं कित्येकांचं आवडतं आहे.
-
केके त्यांच्या गाण्यांमधून चाहत्यांच्या मनात कायम अजरामर राहतील.
-
(सर्व फोटो : केके/ इन्स्टाग्राम)
Photos : ‘हम रहें या न रहें कल’ ते ‘यारों ये दोस्ती’…केके यांच्या ‘या’ गाण्यांनी तरुणाईला लावलं होतं वेड
Singer KK Passes Away : ९०च्या दशकात केके यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं.
Web Title: Bollywood singer kk dies at the age of 53 in kolkata hum rahe ya na rahe to yaaron ye dosti have a look on his famous songs photos kak