-
प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी रात्री कोलकात्यामध्ये निधन झालं. केकेच्या निधनाची बातमी ऐकताच सगळ्यांना दुःखद धक्का बसला.
-
केकेच्या निधनानंतर मात्र अभिनेता गायक इम्रान हाश्मी ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
-
. याचं कारण देखील तितकंच खास आहे. इमरानसाठी केकेने खूप गाणी गायली आहेत.
-
केकेच्या निधनानंतर इमरानचा आवाज देखील हरपला आहे असं बोललं जात आहे.
-
केके आणि इमरान या गायक-अभिनेत्याची जोडी सुपरहिट होती.
-
चाहते केकेने गायलेली इमरानची गाणी ट्विटरद्वारे शेअर करत गायकाला श्रद्धांजली वाहत आहेत. केकेने इमरानसाठी बरीच रोमँटिक गाणी गायली.
-
केकेच्या निधनानंतर इमरानने दुःख व्यक्त करत म्हटलं आहे की, “एक असा आवाज, एक असं टॅलेंट, ज्याच्यासारखी जादू दुसरं कोणीच दाखवू शकत नाही. आता त्याच्यासारखी गाणी गायलीही जात नाहीत. केकेने जी गाणी गायली त्यावर काम करणं माझ्यासाठी नेहमीच खास होतं. त्याच्यासारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही. केके तू नेहमीच आमच्या हृदयात राहशील. तुझ्या गाण्यातून तू नेहमीच श्रोत्यांमध्ये जिवंत राहणार.”
-
जरा सा, तू ही मेरी शब है, बिते लम्हे, सोनिये यांसारखी हिंदी रोमँटिक गाणी केकेने इमरानसाठी गायली.
-
या गाण्यांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)
Photos : इमरान हाश्मीसाठी केकेने गायली एकापेक्षा एक सुपरहिट गाणी, अभिनेत्याला दुःख अनावर
प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी रात्री कोलकात्यामध्ये निधन झालं. केकेच्या निधनाची बातमी ऐकताच सगळ्यांना दुःखद धक्का बसला. केकेने अनेक सुपरहिट गाणी बॉलिवूडला दिली. त्याचबरोबरीने अभिनेता इमरान हाश्मीसाठी त्याने एकापेक्षा एक सुपरहिट गाणी गायली.
Web Title: Emraan hashmi and singer kk always were magical duo and his superhit songs kmd