-
प्रविण तरडे लिखित, दिग्दर्शित आणि अभिनित ‘सरसेनापती हंबीरराव’ या बहुचर्चित चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
-
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती म्हणून कारभार पाहिलेले हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे.
-
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांकडून या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे.
-
चित्रपटातील कलाकारांचे भरभरून कौतुक होताना दिसत आहे.
-
‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात अभिनेता शुभांकर एकबोटे याने ‘धनाजी जाधव’ ही भूमिका साकारली आहे.
-
शुभांकरने त्याच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिला आहे.
-
शुभांकरने नाटकाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली.
-
‘मंत्र’ या चित्रपटातून शुभांकरने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.
-
यानंतर अभिनेत्री धनश्री काडगावकरसोबत ‘चिठ्ठी’ या चित्रपटात काम करण्याची संधी त्याला मिळाली.
-
‘धर्मवीर’ या बहुचर्चित चित्रपटातही शुभांकर झळकला आहे.
-
शुभांकर दिवंगत मराठी अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा आहे.
-
अश्विनी यांनी अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
-
त्या उत्तम नृत्यांगणादेखील होत्या.
-
त्या उत्तम नृत्यांगणादेखील होत्या.
-
त्या उत्तम नृत्यांगणादेखील होत्या.
-
त्या उत्तम नृत्यांगणादेखील होत्या.
-
आईच्या पावलावर पाऊल ठेवत शुंभाकरदेखील अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे.
-
(सर्व फोटो : शुभांकर एकबोटे/ इन्स्टाग्राम)
Photos : ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांच्या मुलाने साकारली आहे महत्त्वाची भूमिका
‘सरसेनापती हंबीररीव’ चित्रपटात दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा अभिनेता शुभांकर एकबोटेने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
Web Title: Pravin tarde sarsenapati hambirrao movie fame actor shubhankar ekbote played dhanaji jadhav role is son of marathi actress ashwini ekbote photos kak