• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. comedian rajpal yadav when got 500 rupees for laughing had a fierce party with friends nrp

“त्यावेळी फक्त हसण्यासाठी आम्हाला ५०० रुपये मिळाले होते”, राजपाल यादवने सांगितला ‘तो’ किस्सा

पण राजपाल यादवला सिनेसृष्टीत करिअर करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली.

June 17, 2022 19:37 IST
Follow Us
  • Rajpal Yadav
    1/20

    आपल्या अभिनयाने लोकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेता म्हणून राजपाल यादवला ओळखले जातात.

  • 2/20

    राजपाल यादव हा त्याच्या उत्कृष्ट कॉमेडीसाठी ओळखला जातो.

  • 3/20

    एक उत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून तो घराघरात प्रसिद्ध आहे.

  • 4/20

    राजपालने ‘हंगामा’, ‘चुप चुप के’, ‘ढोल’, ‘फिर हेरा फेरी’, ‘मालामाल विकली’, ‘भुल भुल्लैया’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • 5/20

    पण राजपाल यादवला सिनेसृष्टीत करिअर करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली.

  • 6/20

    नुकतंच एका मुलाखतीत त्याने याबाबत भाष्य केले आहे.

  • 7/20

    “मी सिनेसृष्टीत करिअर करण्यासाठी प्रचंड धडपड केली. मी जेव्हा सिनेसृष्टीत करिअर करण्यासाठी संघर्ष करत होतो तेव्हा माझ्यासोबत माझे तीन मित्र होते”, असे राजपाल यादव म्हणाला.

  • 8/20

    “जेव्हा जेव्हा मी ऑडिशन देण्यासाठी जायचो तेव्हा ते तिघेजणही माझ्यासोबत यायचे. आम्ही चौघे एकत्र ऑडिशनसाठी जायचो”, असे राजपालने सांगितले.

  • 9/20

    त्यापुढे तो म्हणाला, “एकदा एका रविवारी आमचे सर्व मित्र घरी असताना आमच्याकडे असलेल्या पेजवर कॉल बॅक असा मेसेज आला होता.”

  • 10/20

    “त्यावेळी आम्ही राहत असलेल्या घराच्या खाली सार्वजनिक फोन होता. मी तातडीने तिकडे जाऊन त्या नंबरवर फोन केला”, असे राजपालने म्हटले.

  • 11/20

    “यावेळी समोरुन एकाने सांगितले की, मुंबईतील सूचक बंगल्यात शूटींग सुरु आहे. या शूटींगसाठी चार लोकांची गरज आहे.”

  • 12/20

    “तुम्हाला त्याठिकाणी काहीही करायचे नाही, फक्त हसायचे आहे.”

  • 13/20

    “त्यानंतर आम्ही चारही मित्र बस पकडून सूचक बंगल्यावर पोहोचलो. तिकडे आधीच १० ते १५ लोक जमलेली होती”, असे त्याने हा किस्सा सांगताना म्हटले.

  • 14/20

    “त्यावेळी एक व्यक्ती हा डायलॉग बोलणार होता आणि आम्हाला त्याच्या डायलॉगवर हसायचे होते.”

  • 15/20

    “त्यावेळी फक्त हसण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला ५०० रुपये मिळाले होते. पैसे मिळाल्यानंतर आम्ही सर्वजण फार खूश झालो.”

  • 16/20

    “दोन तासानंतर ती शूटींग संपल्यावर आम्ही घरी आलो. त्यानंतर आम्ही मिळालेल्या पैशातून छान पार्टी केली होती”, असे राजपाल म्हणाला.

  • 17/20

    यानंतर राजपाल यादवने मागे वळून पाहिले नाही. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र ‘चुप चुपके’ या चित्रपटातील बांड्या ही भूमिका सगळ्यांच्या पसंतीस उतरली होती.

  • 18/20

    मात्र ‘चुप चुपके’ या चित्रपटातील बांड्या ही भूमिका सगळ्यांच्या पसंतीस उतरली होती.

  • 19/20

    राजपालने शिल्पा शेट्टीचा ‘हंगामा २’ या चित्रपटामध्ये काम केले. त्या आधी ‘कुली नंबर १’ या चित्रपटात काम केले होते. राजपालचे हे दोन्ही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले होते.

  • 20/20

    (सर्व फोटो राजपाल यादव/ इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Comedian rajpal yadav when got 500 rupees for laughing had a fierce party with friends nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.