• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sumeet raghavan kiran mane swara bhaskar talk about eknath shinde maharashtra politics situation see details kmd

कोणी केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक, तर कोणी व्यक्त केला संताप, राजकीय घडामोडींवर कलाकारांची मतं

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या अनेक घडामोडी सुरु आहेत. सध्याचं राजकीय वातावरण पाहता कलाविश्वातील मंडळींनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. कोणी ट्विट करत आपलं मत मांडलं तर कोणी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे खास पोस्ट शेअर केली. याबाबतच आज आपण जाणून घेणार आहोत.

Updated: June 23, 2022 18:51 IST
Follow Us
  • Kiran Mane, Eknath Shinde, Actor Kiran Mane, CM Uddhav thackeray speech, CM Uddhav thackeray,
    1/10

    बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने राजकीय घडामोडींबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

  • 2/10

    तिने ट्विट करत म्हटलं की, “काय मूर्खपणा चालला आहे! आपण मत देतोच का… निवडणुकांऐवजी दर ५ वर्षांनी बंपर सेल लावा… #MaharashtraPoliticalTurmoil”

  • 3/10

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकून अभिनेते किरण माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • 4/10

    “अतिशय आत्मविश्वासानं, मनापासून बोलले ! एवढं घडूनही ‘Cool’ आहेत हे लै भारी. सत्तेसाठी तडफडणार्‍या, आक्रस्ताळेपणा करणार्‍या नेत्यांच्या तुलनेत हा बाणेदारपणा लैच भावला. सत्ता बळकावणार्‍याला नाही, तर नीच वृत्तीपुढं न झुकणार्‍याला इतिहास लक्षात ठेवतो”, असं किरण माने यांनी लिहिलं आहे.

  • 5/10

    मराठी अभिनेता आरोह वेलणकरने तीन ट्विट करत महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

  • 6/10

    “संपूर्ण राज्य आणि महाराष्ट्रातील मतदारांनी महाविकासआघाडी सरकारमध्ये झालेला गोंधळ आणि अनागोंदी पाहावी”, असे त्याने या ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • 7/10

    शिवसेना नेते एकनाथ शिंदेच्या ट्विटला रिट्विट करत ‘परत जाऊ नका आता म्हणजे मिळवलं’, असं आरोहने म्हटलं आहे.

  • 8/10

    शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळंच वळण मिळालं आहे. अभिनेता सुमीत राघवननं यावर प्रतिक्रिया दिली आहे.

  • 9/10

    सुमीतने एका वृत्तपत्रिकेतील एक लेख शेअर केला आहे. हा लेख शेअर करताना सुमीत म्हणाला, “एक साधा प्रश्न. माझ्या सारख्या सामान्य मुंबईकराला जेव्हा कळत होतं की जे झालं ते योग्य नव्हतं (म. वि. आ) तर मग एकनाथ शिंदे साहेब, तुमच्या सारख्या कट्टर शिवसैनिकाला, जो बाळासाहेबांच्या आणि खासकरून दिघे साहेबांच्या तालमीत तयार झाला आहे, अडीच वर्ष का लागावी हा निर्णय घ्यायला?”

  • 10/10

    सुमीतने आणखी एक ट्विट करत म्हटलं की, “साहेब, तुमच्या यादीत ‘महाराष्ट्र हित’ चौथ्या क्रमांकावर आहे आणि माझा मुद्दा हाच आहे. शिवसैनिक भरडले जात आहेत, त्यांचे खच्चीकरण होत आहे. अनैसर्गिक आघाडी वगैरे हे सगळं बरोबर आहे, पण जो सामान्य माणूस आहे तो सदैव मागेच राहणार. तो जो ‘आता’ आहे ना त्या वाक्यातला तो वेदना देणारा आहे.”

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsसुमीत राघवनSumeet Raghvan

Web Title: Sumeet raghavan kiran mane swara bhaskar talk about eknath shinde maharashtra politics situation see details kmd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.