-
माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच चर्चेत असतात.
-
कधी त्यांच्या नवीन गाण्यामुळे तर कधी आपल्या वक्तव्यामुळे अमृता यांना ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो.
-
इतकंच नव्हे तर अमृता वेगवेगळ्या लूकमधील फोटो देखील त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतात.
-
अमृता यांचे असेच काही लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
त्यांनी एका पुरस्कार सोहळ्यानिमित्त दुबई येथे हजेरी लावली होती.
-
यावेळी त्यांनी फोटोशूट देखील केलं.
-
यावेळी त्यांचा वेस्टर्न गाऊनमधील लूक पाहायला मिळाला.
-
तसेच एका फोटोमध्ये त्यांनी ब्लेजर परिधान केलं असल्याचंही दिसत आहे. नेटकऱ्यांनी ‘अति सुंदर’ म्हणत त्यांच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.
-
सोशल मीडियावर त्यांचे लाखोंच्या घरात चाहते आहेत. त्यांनी अमृता यांच्या या लूकला पसंती दर्शवली आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : अमृता फडणवीस यांच्या हटके लूकची चर्चा, फोटो पाहून नेटकरी म्हणाले…
माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दुबई येथे त्यांनी एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यादरम्यान त्यांनी खास फोटोशूट केलं.
Web Title: Amruta fadnavis western dress look from dubai she share photos on instagram see details kmd