-
यंदाचा ‘मिस इंडिया २०२२’चा किताब कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं पटकावला.
-
‘मिस इंडिया २०२२’ हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
-
जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला अनेक कलाकार मंडळींनी देखील हजेरी लावली होती.
-
यावेळी अभिनेत्री नेहा धुपिया, तिची दोन मुलं आणि पती अंगदने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
-
‘मिस इंडिया २०२२’च्या जजच्या पॅनलपदी नेहाची निवड करण्यात आली होती.
-
यावेळी नेहाने आपल्या दोन मुलांसह मंचावर हजेरी लावली.
-
नेहा या कार्यक्रमाची आता परीक्षक असली तरी तिने वीस वर्षांपूर्वी ‘मिस इंडिया’चा किताब पटकावला होता. पुन्हा एकदा ‘मिस इंडिया’ आपल्या डोक्यावर आहे हे पाहून ती भावूक झाली.
-
नेहाने इन्स्टाग्रामद्वारे फोटो शेअर करत या आठवणींना उजाळा दिला आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : ‘मिस इंडिया २०२२’च्या कार्यक्रमामध्ये नेहा धुपियाची मुलं, पतीने वेधलं साऱ्यांचं लक्ष, अभिनेत्री झाली भावूक
अभिनेत्री नेहा धुपियाने वीस वर्षांपूर्वी ‘फेमिना मिस इंडिया’चा किताब पटकावला. यंदा तिने ‘मिस इंडिया २०२२’ या कार्यक्रमाचं परीक्षक म्हणून काम पाहिलं.
Web Title: Miss india winner 2022 neha dhupia completes 20 years and actress childrens husband photos viral on social media kmd