-
झी मराठीवरील एकत्र कुटुंब पद्धतीचं दर्शन घडवणारी ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.
-
या मालिकेतील अदिती आणि सिद्धार्थ ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
-
या मालिकेत अदितीची भूमिका अभिनेत्री अमृता पवार साकारताना दिसत आहे.
-
अमृताने अल्पावधीतच अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली. नुकतंच अमृता ही विवाहबंधनात अडकली आहे.
-
अमृताने नील पाटीलसोबत लग्नगाठ बांधत नव्या संसाराला सुरुवात केली आहे.
-
अमृता आणि नीलचा विवाहसोहळा बुधवारी पार पडला. तिच्या या विवाहसोहळ्याचे काही खास क्षण तिने चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
-
अमृताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तिच्या हळदीपासून लग्नापर्यंतची धामधूम पाहायला मिळत आहे.
-
यात तिच्या लग्नाचे काही निवडक क्षण पाहायला मिळत आहेत. तसेच तिच्या लग्नात मित्र मैत्रिणी, कुटुंबाने केलेल्या गंमतीजमतीही दिसत आहेत.
-
या लग्नाचा व्हिडीओ पोस्ट करताना तिने त्याला हटके कॅप्शन दिले आहे. ‘एक पाऊल पुढे…’, असे अमृताने या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
-
विशेष म्हणजे तिच्या विवाहसोहळ्याला अनेक मित्र मैत्रिणी उपस्थित होते. यावेळी अनेक लोकांनी त्यांच्या लग्नाचे फोटोही शेअर केले आहेत.
-
या फोटोत अमृता ही फार सुंदर दिसत आहे.
-
तिने लग्नाच्या वेळी छान दाक्षिणात्य लूक असलेली साडी परिधान केली होती.
-
तर रिसेप्शनच्या वेळी तिने छान डिझाईनर साडी नेसली होती.
-
अमृता-नीलचा साखरपुडा एप्रिल महिन्यात पार पडला होता.
-
दरम्यान अमृताने सोनी मराठीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ आणि ‘जिगरबाज’ या मालिकेत काम केले होते. पण ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’या मालिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली.
‘एक पाऊल पुढे…’, ‘तुझ्या माझ्या संसाराला…’ फेम अमृता पवारच्या विवाहसोहळ्याचे खास फोटो
अमृता आणि नीलचा विवाहसोहळा बुधवारी पार पडला.
Web Title: Tujhya majhya sansarala aani kay hava actor amruta pawar has got married to her beau neel patil nrp