-
गेल्या काही वर्षात दाक्षिणात्य चित्रपटांचा दबदबा वाढतोय. दाक्षिणात्य चित्रपट कमाईच्या बाबतीतही बॉलीवूड चित्रपटाच्या पुढे गेल्याचं दिसतं.
-
अनेक दाक्षिणात्य कलाकार बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. येत्या काळात आघाडीच्या दाक्षिणात्य अभिनेत्री बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.
-
या अभिनेत्री चित्रपटांमध्ये बॉलीवूड कलाकारांसोबत रोमान्स करताना दिसणार आहेत. पाहुयात कोणत्या दाक्षिणात्य अभिनेत्री कोणत्या बॉलीवूड कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणार ते…
-
Shahrukh Khan – Nayanthara: शाहरुख खान साऊथची सुपरस्टार अभिनेत्री नयनतारासोबत ‘जवान’ या चित्रपटात दिसणार आहे.
-
Ranbir Kapoor – Rashmika Mandana: रणबीर कपूर संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटात रश्मिका मंदानाशी ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.
-
Siddharth Malhotra – Rashmika Mandana: रश्मिका मंदाना सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटात काम करणार आहे.
-
Salman Khan – Pooja Hegde: पूजा हेगडे सलमान खानसोबत ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटामध्ये दिसणार आहे.
-
Ajay Devgn – Priyamani: ‘मैदान’ या चित्रपटात अजय देवगण साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियामणीसोबत दिसणार आहे.
-
Ayushman Khurrana – Samantha Ruth Prabhu : आयुष्मान खुरानाच्या पुढील चित्रपटासाठी समंथा रुथ प्रभूला साईन करण्यात आले आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही. (सर्व फोटो सोशल मीडिया)
नयनतारा-शाहरुख ते रश्मिका-रणबीर; साऊथच्या ‘या’ प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रींबरोबर पडद्यावर रोमान्स करणार बॉलिवूड स्टार
पाहुयात कोणत्या दाक्षिणात्य अभिनेत्री कोणत्या बॉलीवूड कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणार ते…
Web Title: Nayanthara to rashmika mandana and samantha ruth will romance bollywood actors shahrukh khan ranbir kapoor siddharth malhotra movies hrc