-
अभिनेते शरद पोंक्षे यांची लेक तिचे वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परदेशात रवाना झाली आहे.
-
शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली होती.
-
‘पिल्लू निघालं वैमानिक व्हायला’ असं म्हणत शरद पोंक्षे यांनी आपल्या लाडक्या लेकीला भावनिक निरोप दिला आहे.
-
यात त्यांची लेक सिद्धी दिसत आहे. त्यांचा हा फोटो मुंबई विमानतळावरचा आहे.
-
शरद पोंक्षे यांना मुलगा स्नेह आणि मुलगी सिद्धी अशी दोन मुलं आहेत.
-
मुलगा स्नेहने वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवलं आहे.
-
स्नेहला अभिनयक्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करायचं आहे.
-
‘धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे’ या चित्रपटाच्या दिग्दर्शक टीममध्ये स्नेहने काम केलं. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
वैमानिक होण्यासाठी शरद पोंक्षे यांची लेक परदेशात रवाना, मुलगाही ‘या’ क्षेत्रात करतो काम
अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगी सिद्धी वैमानिक होण्यासाठी परदेशामध्ये रवाना झाली आहे. तर दुसरीकडे त्यांचा मुलगा कलाक्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करु इच्छित आहे. शरद पोंक्षे यांच्या मुलांबाबत काही खास गोष्टी जाणून घेऊयात.
Web Title: Sharad ponkshe daughter siddhi become a pilot and son of actor working in film industry see details kmd