-
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.
-
आलिया-रणबीर यांनी जवळपास पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं. रणबीरने आलियाला केन्या येथील मसाई मारा ठिकाणी प्रपोज केलं होतं. हे जगातील सगळ्यात सुंदर ठिकाणांपैकी ओळखलं जातं.
-
सैफ अली खानने देखील पत्नी करीनाला हटके अंदाजात प्रपोज केलं.
-
दोघं पॅरिसला गेले असता सैफने या ट्रिपदरम्यान करीनाला लग्नासाठी विचारलं होतं.
-
प्रियांक चोप्रा आणि निक जोनस सध्या त्यांच्या सुखी संसारामध्ये रमले आहेत.
-
ग्रीस येथे नीकने प्रियांका प्रपोज करत आपल्या प्रेमाची कबुली दिली.
-
सोनम कपूर आणि आनंद आहुजा लवकरच आई-बाबा होणार आहेत.
-
आनंदने तर न्यूयॉर्कच्या रस्त्यावरच सोनमला प्रपोज केलं. तो क्षण सोनमसाठी तिच्या आयुष्यामधील सगळ्यात महत्त्वपूर्ण क्षण होता.
-
१९९१मध्ये शाहरुख खान आणि गौरी खानचं लग्न झालं. शाहरुखने चक्क मुंबईच्या जुहू बीच येथे गौरीला प्रपोज केलं होतं. (फोटो – फाईल फोटो)
Photos : ‘या’ रोमँटिक ठिकाणी बॉलिवू़ड सेलिब्रिटींनी आपल्या आवडत्या व्यक्तीला केलं प्रपोज
बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध जोडप्यांमधील प्रेम पाहता तुम्हालाही कधीतरी प्रेमात पडावसं वाटलं असेल ना… आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी ही सेलिब्रिटी मंडळी परदेशातील ठराविक ठिकाणींची निवड करतात. ही ठिकाणं नेमकी कोणती याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.
Web Title: Bollywood famous celebrity planned their proposals at romantic places see details kmd