-
जगप्रसिद्ध अभिनेत्री-गायिका जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे.
-
५२ वर्षीय जेनिफर गेल्या काही वर्षांपासून ४९ वर्षीय सुप्रसिद्ध अभिनेता बेन अफ्लेकला (Ben Affleck) डेट करत होती.
-
आता या दोघांनी त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. जेनिफर-बेन विवाहबंधनात अडकले आहेत.
-
अमेरिका येथील लास वेगासमध्ये या दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला.
-
जेनिफर-बेनने २००२मध्ये साखरपुडा केला. पण एका वर्षामध्येच दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आला. त्यानंतर जेनिफर-बेनने वेगवेगळ्या व्यक्तींशी लग्न केलं. संसार थाटला.
-
पण गेल्या वर्षी पुन्हा एकदा दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. त्यादरम्यान दोघांनी एप्रिलमध्ये पुन्हा साखरपुडा केला.
-
जेनिफरला दोन मुलं आहेत. तसेच तिचं हे दुसरं नव्हे तर चौथं लग्न आहे.
-
जेनिफर कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. १९९७मध्ये ओजानी नोआबरोबर तिने लग्न केलं. त्याच्याबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर तिने क्रिस जुडबरोबर २००१मध्ये लग्नगाठ बांधली. २००३मध्येच त्यांच्या नात्याचा दि एण्ड झाला. त्यानंतर २००४मध्ये गायक मार्कबरोबर तिचं नातं जुळलं. २०१४मध्ये या दोघांचाही घटस्फोट झाला. (फोटो – फाईल फोटो, इन्स्टाग्राम)
Photos : ३ लग्न, २ मुलं, कोट्यावधींची संपत्ती अन् ५२व्या वर्षी जेनिफर लोपेझने एक्स बॉयफ्रेंडबरोबर थाटला संसार
जगप्रसिद्ध अभिनेत्री-गायिका जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. ५२ वर्षीय जेनिफर गेल्या काही वर्षांपासून सुप्रसिद्ध अभिनेता बेन अफ्लेकला (Ben Affleck) डेट करत होती. आता या दोघांनी त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
Web Title: Jennifer lopez new bride shares pic from the bedroom married with ben affleck after 20 years know about her lovestory kmd