-
आज ६८व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा होणार आहे.
-
कलाविश्वातील दिग्गज कलाकार मंडळींना या मानाच्या पुरस्काराने आजवर गौरवण्यात आलं आहे.
-
सुप्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांनी आजवर तब्बल ५ राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत. ‘अंकुर’, ‘अर्थ’, ‘खंडहर’, ‘पार’ आणि ‘गॉडमदर’ या चित्रपटांसाठी त्यांना हे पुरस्कार मिळाले.
-
शबाना आझमी यांच्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे अभिनेते ठरले.
-
अमिताभ यांच्या नावे आतापर्यंत ४ राष्ट्रीय पुरस्कार आहेत. ‘अग्निपथ’, ‘ब्लॅक’, ‘पा’ आणि ‘पीकू’ चित्रपटांसाठी त्यांना या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं.
-
अभिनेत्री कंगना रणौतला देखील आजवर ४ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
-
‘फॅशन’, ‘क्वीन’, ‘तनु वेड्स मनु’ आणि ‘मणिकर्णिका’ चित्रपटांसाठी तिला हा पुरस्कार मिळाला.
-
त्याचबरोबरीने तब्बल ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये बऱ्याच कलाकारांचा समावेश आहे.
-
कमल हसन, नाना पाटेकर, पंकज कपूर, नसीरुद्दीन शहा यांसारख्या कलाकारांचा यामध्ये समावेश आहे. (फोटो – सर्व फाईल फोटो)
68th National Film Awards 2022 : आजवर कोणत्या कलाकारांनी पटकावले सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार?
आज ६८व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा होणार आहे. कलाविश्वातील हा सर्वाधिक मानाचा पुरस्कार आपल्याला मिळावा अशी प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. आजवर कोणत्या कलाकारांनी सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत हे आपण पाहणार आहोत.
Web Title: 68th national film awards 2022 know who won maximum award till date see list kmd