-
छोट्या पडद्यावरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.
-
या मालिकेमध्ये परीची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकार मायरा वायकुळने कमी कालावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकलं.
-
इतकंच नव्हे तर मायराचे सोशल मीडियावर पारंपरिक तसेच वेस्टर्न लूकमधील फोटो प्रेक्षकांना आवडतात.
-
मायराने नुकतंच एक खास फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोशूटसाठी तिने खास नऊवारी साडी परिधान केली असल्याचं दिसत आहेत.
-
या फोटोशूटचं वैशिष्ट्य म्हणजे मायराच्या हाती गणपती बाप्पाची मुर्ती दिसत आहे.
-
गणपती बाप्पाच्या मुर्तीबरोबर मायराने पारंपरिक लूकमध्ये केलेलं फोटोशूट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : डोक्यावर फेटा, नाकात नथ अन् नऊवारी साडी, ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील परीचं खास फोटोशूट
झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमुळे बालकलाकार मायरा वायकुळ घराघरांत पोहोचली. आता तर ती सगळ्यांचीच लाडकी झाली आहे. मायराचं बोलणं, तिचं हसणं सगळं काही प्रेक्षकांना आवडतं. मायराने नुकतंच पारंपरिक लूकमध्ये खास फोटोशूट केलं आहे.
Web Title: Mazhi tuzhi reshimgath zee marathi serial child artist myra vaikul traditional photoshoot with ganesh murti see photos kmd