-
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाद्वारे अभिनेत्री श्रेया बुगडे प्रेक्षकांना खळखळून हसवते.
-
श्रेया सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते.
-
सध्या ती गोव्यामध्ये पती निखिल सेठबरोबर सुट्ट्या एण्जॉय करताना दिसत आहे.
-
यादरम्यानचे काही फोटो श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये तिने वेस्टर्न ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे.
-
त्याचबरोबरीने पतीसोबतचे तिचे काही खास फोटो लक्षवेधी ठरत आहेत.
-
“पुन्हा पुन्हा मी गोव्याच्या प्रेमात पडते” असं श्रेयाने हे फोटो शेअर करत म्हटलं आहे.
-
तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांनी अधिकाधिक पसंती दर्शवली आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : गोव्यामध्ये रमली श्रेया बुगडे, नवऱ्यासोबत शेअर केले खास फोटो
अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या गोव्यामध्ये सुट्टी एण्जॉय करताना दिसत आहे. यादरम्यानचे काही फोटो श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
Web Title: Actress shreya bugade goa trip photos with husband goes viral on social media see details kmd