-
मराठीमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये शरद पोंक्षे यांचं नाव आदराने घेतलं जातं.
-
कर्करोगासारख्या आजारावर यशस्वीरित्या मात करत शरद पोंक्षे यांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या कामाला सुरुवात केली.
-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेमध्ये ते सध्या काम करत आहेत.
-
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे शरद पोंक्षे आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरले आहेत.
-
त्यांनी चक्क खास फोटोशूट केलं आहे.
-
निळ्या रंगाचं शर्ट आणि पँट त्यांनी परिधान करत हे फोटोशूट केलं.
-
त्यांचा हा नवा लूक पाहून नेटकरीही भारावून गेले आहेत. “या वयातही खूपच तरुण दिसत आहात”, “अतिसुंदर” अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
-
वयाच्या ५५व्या वर्षीही त्यांचा हा नवा लूक पाहून चाहतेही भारावून गेले आहेत. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : “या वयातही अगदी तरुण दिसता” चक्क शरद पोंक्षे यांनी केलं खास फोटोशूट, साधेपणाने वेधलं चाहत्यांचं लक्ष
अभिनेते शरद पोंक्षे यांनी चक्क खास फोटोशूट केलं आहे. त्यांच्या या साध्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Web Title: Actor sharad ponkshe photoshoot goes viral on social media fans says looking very young see pics kmd