• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss marathi 4 season siddharth jadhav is really hosting show or not know the details nrp

“मला महेश मांजरेकर आणि…” ‘बिग बॉस मराठी’च्या सूत्रसंचालनाबद्दल प्रश्नावर सिद्धार्थ जाधवचा खुलासा

सिद्धार्थ जाधवला ‘तू बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार का?’ असा प्रश्न विचारण्यात आला.

August 6, 2022 09:00 IST
Follow Us
  • छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे.
    1/18

    छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे.

  • 2/18

    बिग बॉसचे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या तिन्ही भागाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केलं होतं.

  • 3/18

    बिग बॉसच्या निर्मात्यांनी त्यांच्याशी तीन वर्षांसाठी कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. मात्र गेल्यावर्षी ते कॉन्ट्रॅक्ट संपलं आहे.

  • 4/18

    त्यामुळे आता बिग बॉसचे चौथे पर्व कोण होस्ट करणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. बिग बॉसच्या चौथ्या पर्वासाठी सिद्धार्थ जाधवच्या नावाची चर्चा सुरु होती.

  • 5/18

    मात्र आता चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव करणार असल्याचे बोललं जात आहे.

  • 6/18

    बिग बॉसच्या चौथ्या पर्वासाठी सिद्धार्थ जाधवच्या नावाची चर्चा सुरु होती. पण हे वृत्त खरं आहे की खोटं याबद्दल नुकतंच त्याने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला.

  • 7/18

    त्यावेळी सिद्धार्थ जाधवला ‘तू बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने फार हटके उत्तर दिले.

  • 8/18

    यावर उत्तर देताना मकरंद अनासपुरे म्हणाले, “मला त्यादिवशी महेश मांजरेकर सर म्हणाले की बिग बॉसमध्ये सिद्ध्याला एंट्रीबद्दल विचार असं म्हणाले होते. म्हणून मी ही त्याला त्याबद्दल बोललो.”

  • 9/18

    “येत्या ५ ऑगस्टला ‘दे धक्का’ येतोय. तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहावा, अशी इच्छा आहे, असे सिद्धार्थ जाधव म्हणाला.

  • 10/18

    “मला बिग बॉसचा अनुभव खूप मस्त आहे. महेश सरांमुळे मला ती संधी मिळाली होती. त्याच्याविषयी मी आताच काहीही बोलू शकत नाही.” असे सिद्धार्थ जाधवने सांगितले.

  • 11/18

    “कारण मी वेगळ्या कामासाठी इथे आलोय. माझी उत्सुकताही ‘दे धक्का २’ ची आहे.” असेही सिद्धार्थ जाधवने म्हटले.

  • 12/18

    “हा प्रश्नही या काळात, ज्या लेव्हला विचारला जातो, त्या लेव्हलला येण्यासाठी मला महेश मांजरेकर आणि ‘दे धक्का’नेच साथ दिली.” असेही सिद्धार्थ जाधव म्हणाला.

  • 13/18

    “त्यांनी कुठेतरी मला एक स्टँड दिला आहे. त्यामुळे कदाचित कोणीही कोणत्याही कार्यक्रमासाठी माझा विचार करत आहे. छान कार्यक्रमासाठी माझा विचार करत असतील. पण सध्या मला ‘दे धक्का’ची उत्सुकता आहे”, असे सिद्धार्थ जाधवने म्हटले.

  • 14/18

    “त्यासोबत ‘बिग बॉस’बद्दल बोलायचं असेल तर मला एकदा हिंदी बिग बॉससाठी विचारण्यात आलं होतं.” असाही खुलासा त्याने केला.

  • 15/18

    “पण मला असं वाटतं की ‘खतरो के खिलाडी’, ‘नच बलिये’, ‘झलक दिखला जा’ असे किंवा यासारखे रिअॅलिटी शो करणे जास्त आवडतात”, असे सिद्धार्थ जाधव म्हणाला.

  • 16/18

    दरम्यान सध्या सिद्धार्थ जाधव हा ‘दे धक्का 2’ या मराठी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 17/18

    त्यासोबतच तो रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या हिंदी चित्रपटात देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • 18/18

    सर्व फोटो – सिद्धार्थ जाधव/ फेसबुक

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bigg boss marathi 4 season siddharth jadhav is really hosting show or not know the details nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.