• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos posters of banned movies in india avn

Photos : बॉयकॉट वगैरे नाही, या १२ भारतीय चित्रपटांवर थेट बंदीच घातली होती!

गुलजार यांच्यापासून थेट अनुराग कश्यपपर्यंत कित्येक दिग्दर्शकांच्या चित्रपटावर त्या काळात बंदी घातली होती.

August 20, 2022 15:22 IST
Follow Us
  • १) बॅंडिट क्वीन : चंबळची डाकू फुलनदेवी हिच्यावर बेतलेला शेखर कपूर दिग्दर्शित 'बॅंडिट क्वीन' हा चित्रपट भारत सरकारने बॅन केला होता. चित्रपटातली काही दृश्यं ही खूप हिंसक आणि बीभत्स होती. कालांतराने या चित्रपटाला क्लासिकचा दर्जा मिळाला. अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी यात मुख्य भूमिका केली होती.
    1/12

    १) बॅंडिट क्वीन : चंबळची डाकू फुलनदेवी हिच्यावर बेतलेला शेखर कपूर दिग्दर्शित ‘बॅंडिट क्वीन’ हा चित्रपट भारत सरकारने बॅन केला होता. चित्रपटातली काही दृश्यं ही खूप हिंसक आणि बीभत्स होती. कालांतराने या चित्रपटाला क्लासिकचा दर्जा मिळाला. अभिनेत्री सीमा बिस्वास यांनी यात मुख्य भूमिका केली होती.

  • 2/12

    २) कामसूत्र : कामसूत्रसारखा गंभीर विषय या चित्रपटात मीरा नायर यांनी हाताळला. या चित्रपटातली बरीचशी दृश्यं ही फार बोल्ड असल्याकारणाने तेव्हा हा चित्रपट बॅन केला होता. या चित्रपटात हिंदी अभिनेत्री रेखाचीही महत्वाची भूमिका आहे.

  • 3/12

    ३) उर्फ प्रोफेसर : मनोज पहावा, शर्मन जोशी, अंतरा माळी अभिनीत उर्फ प्रोफेसर हा चित्रपटसुद्धा असभ्य भाषा आणि बीभत्स सीन्स यामुळे सेन्सॉरच्या कात्रीत सापडला आणि त्यावर बंदी घालण्यात आली.

  • 4/12

    ४) पांच : अनुराग कश्यपचा पहिलाच चित्रपट सेन्सॉरने बॅन केला तो म्हणजे पांच. हा चित्रपट जोशी-अभ्यंकर खून खटल्यावर बेतलेला होता. यामध्ये के के मेननने महत्वाची भूमिका साकारली होती.

  • 5/12

    ५) ब्लॅक फ्रायडे : मुंबईच्या १९९३ बॉम्ब ब्लास्टवर दिग्दर्शक अनुराग कश्यपने चित्रपट काढला आणि त्याच्या या दुसऱ्या चित्रपटालाही सेन्सॉरने लाल कंदील दाखवला. मुंबई हायकोर्टाने यावर स्टे आणला होता. कालांतराने या चित्रपटावरची बंदी उठवली गेली आणि तो प्रदर्शित झाला. १९९३ मुंबई हल्ल्यावर बनलेला आजवरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ब्लॅक फ्रायडेकडे पाहिलं जातं.

  • 6/12

    ६) परझानिया : गुजरात दंगलीवर बेतलेल्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळाला होता. या चित्रपटाची प्रशंसा झाली तसेच त्यावर बंदीसुद्धा घालण्यात आली होती. नसिरूद्दीन शाह आणि सारिका हे दोघे यात मुख्य भूमिकेत दिसले.

  • 7/12

    ७) वॉटर : दीपा मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटावरही बंदी घालण्यात आली होती. भारतीय विध्वा महिलांच्या आयुष्याचं चित्रण यातून करण्यात आलं होतं. जॉन अब्राहम यामध्ये मुख्य भूमिकेत होता.

  • 8/12

    ८) फिराक : गुजरात दंगलीवर बेतलेल्या या आणखीन एका चित्रपटाच्या विरोधातसुद्धा बरीच निदर्शनं झाली. दिग्दर्शिका नंदिता दास ही हिंदू मुस्लिम यांच्यात फुट पाडत असल्याचा लोकांनी आरोप केला.

  • 9/12

    ९) गांडू : ब्लॅक अँड व्हाईटमध्ये शूट केलेला हा बंगाली चित्रपट त्यातल्या बऱ्याच भडक दृश्यांमुळे बॅन करण्यात आला होता.

  • 10/12

    १०) अनफ्रीडम : इस्लामिक आतंकवाद आणि एका समलिंगी जोडप्याचे भडक बोल्ड सीन असलेला हा चित्रपटदेखील भारतात बॅन आहे.

  • 11/12

    ११) आंधी : सुप्रसिद्ध दिग्दर्शक गुलजार यांचा आंधी हा चित्रपटही इंदिरा गांधी सरकारच्या कालखंडात बॅन केला होता. यात इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचं प्रयत्न केला गेला आहे असे आरोप करण्यात आले होते. नंतर आलेल्या सरकारने या चित्रपटावरची बंदी उठवली.

  • 12/12

    १२) लिपस्टिक अंडर माय बुरखा : कनिका ढीलॉन या दिग्दर्शिकेचा हा चित्रपट महिलांच्या स्वातंत्र्यावर भाष्य करणारा जरी असला तरी यातले बरचसे सीन्स हे खूप अश्लील होते त्यामुळेच यावर बंदी घालण्याची विनंती करण्यात आली होती. (फोटो सौजन्य : IMDB)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Photos posters of banned movies in india avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.