-
मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री पूजा सावंतच्या नावाचाही समावेश आहे.
-
पूजाने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
-
सध्या ती ‘दगडी चाळ २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
मराठीमधील या प्रसिद्ध अभिनेत्रीचा जन्म सामान्य कुटुंबामध्ये झाला.
-
याबाबत पूजानेच लोकसत्ता ऑनलाईनच्या ‘डिजीटल अड्डा’ला हजेरी लावली असता सांगितलं.
-
पूजा म्हणाली, “बऱ्याच जणांना माहित नाही पण माझा जन्म परेलचा आहे. आयुष्यातील खूप मोठा भाग आम्ही चाळीत राहिलो आहे. शाळेत असताना मी चाळीतल्या लव्हस्टोरी पाहिल्या आहेत.”
-
“अर्थात मी कधी त्या लव्हस्टोरीचा हिस्सा नव्हते. एक उदाहरण सांगते एक मुलगा आणि मुलगी होते. जे माझ्या समोरच्या दोन चाळींमध्ये राहायचे. तो मुलगा एक शिट्टी वाजवायचा.”
-
“ती शिट्टी संपूर्ण चाळीला ऐकू जायची. त्या शिट्टीचा आवाज ऐकून ती मुलगी बाहेर येणार. मग आम्ही त्या दोघांनाही बघायचो. हे सगळं मी अनुभवलं आहे.”
-
“चाळीमध्ये राहण्याची मजा फारच वेगळी आहे. तिथे ज्याप्रकारे सण साजरे होतात, आपुलकी, एकता असते ते खरंच छान असतं. एकमेकांशी भांडतात पण काही गरज असेल तर तितक्याच ताकदीने एकत्र येतात. हे फक्त चाळीमध्येच घडताना मी पाहिलं आहे.”
-
पूजाने यावेळी ती राहत असलेल्या चाळीबाबत आणि तिथल्या आठवणींना उजाळा दिला.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
परळमध्ये जन्म, तेथील राहणीमान अन्…; पूजा सावंतला आठवले चाळीमधील ‘ते’ जुने दिवस
अभिनेत्री पूजा सावंतने तिच्या बालपणींच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Web Title: Dagadi chawl 2 movie actress pooja sawant talk about here lifestyle and born in chawl see details kmd