-
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या मराठमोळ्या लूकसाठी प्रसिद्ध आहे.
-
नुकतंच तिने गणपती बाप्पाबरोबरचे काही फोटोज तिच्या सोशल मीडिया अकाऊंटव शेअर केले आहेत.
-
या फोटोमध्ये तिने पारंपरिक मराठमोळी साडी नेसली आहे.
-
श्रद्धाचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो.
-
आता पुढील दिवस केवळ मोदकच खायचे, असं म्हणत श्रद्धाने हा फोटो तिच्या इनस्टा स्टोरीला देखील ठेवला आहे.
-
श्रद्धाने ‘आशिकी २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
श्रद्धा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिची आई महाराष्ट्रियन असल्यामुळे ती सगळे हिंदू आणि मराठी सण अगदी थाटात साजरे करते.
-
श्रद्धा उत्तम मराठीसुद्धा बोलते. कित्येकवेळा तिने पत्रकारांशी थेट मराठीत संवाद साधून त्यांना आश्चर्यचकित केले आहे.
-
श्रद्धाचा हा खास मराठमोळा लूक खूप व्हायरल झाला आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)
Photos : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या घरच्या बाप्पाचे फोटो आणि तिचा मराठमोळा लूक पाहिलात का?
श्रद्धा कपूरच्या घरी विराजमान झाले गणराय. श्रद्धाचा पारंपरिक लूक व्हायरल!
Web Title: Bollywood actress shraddha kapoor maharashtrian look and ganpati bappa darshan viral photos avn