-
‘RRR’सारखा सुपरहीट चित्रपट देणारे एस. एस. राजामौली यांची ख्याती साऱ्या देसभरात पसरली आहे. ‘मगधिरा’ ‘बाहुबली’सारखे चित्रपट करून त्यांनी साऱ्या जगाला भारतीय चित्रपटांची दखल घ्यायला भाग पाडलं आहे.
-
नुकतंच राजामौली ही अयान मुखर्जी दिग्दर्शित आणि रणबीर कपूर, आलिया भट्ट अभिनीत बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’च्या टीमबरोबर प्रमोशनमध्ये दिसले होते.
-
राजामौली यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर ‘ब्रह्मास्त्र’ विषयी खुलासा करणारा एक छोटा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओखाली सगळ्यांनी राजामौली यांच्या या कृतीचा विरोध केला आहे. बॉलिवूडच्या चित्रपटाला प्रमोट केल्याने राजामौली यांचे जगभरातले फॅन्स नाराज आहेत. त्यांनी या व्हिडिओच्या खाली कॉमेंट सेक्शनमध्ये त्यांची खदखद व्यक्त केली आहे.
-
राजामौली यांच्या या कृतीचं प्रत्येकाने खंडन केलं आहे. बॉलिवूडच्या चित्रपटांना सपोर्ट केल्याने लोकं बरेच नाराज आहेत.
-
लोकांनी तर त्यांना यासाठी करण जोहर कडून किती मानधन घेतलं असं विचारात त्यांची खिल्ली उडवली आहे.
-
काही चाहत्यांनी तर “द कश्मीर फाईल्स आणि ‘कार्तिकेय २ च्या वेळेस अशी पोस्ट का केली नाहीत ?” असा सवालच राजामौली यांना केला आहे.
-
राजामौली यांनी जरी प्रमोशन केलं असलं तरी सोशल मीडियावर लोकं या चित्रपटालाही बॉयकॉट करण्याची मागणी करत आहेत.
-
लोकांच्या कॉमेंट बघून राजामौली यांची ही कृती त्यांना अजिबात आवडली नसल्याचं स्पष्ट झालंय.
-
कॉमेंटमधून लोकांनी तुमच्यासारख्या दिग्गज लोकांनी बॉलिवूडला पाठिंबा देऊ नका अशी विनंती केली आहे.
-
येत्या ९ सप्टेंबरला ब्रह्मास्त्र प्रदर्शित होणार आहे.
-
खूप आधीपासूनच या चित्रपटाला बॉयकॉट करा असा ट्रेंड सुरू होता. आता राजामौली यांच्या या व्हिडिओमुळे तो ट्रेंड पुन्हा जोर धरू लागला आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस आणि फेसबुक)
Photos : ‘ब्रह्मास्त्र’चं प्रमोशन करणं राजामौलींना पडलं महागात, राग अनावर झालेल्या चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया बघा
राजामौली यांचा ब्रह्मास्त्रचं प्रमोशन करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Web Title: People angry reaction on ss rajamouli promotional video for brahmastra on social media avn