-
मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने कलाविश्वात अप्लावधीतच स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.
-
नाटक, मालिका, चित्रपटांतून अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.
-
‘नांदा सौख्य भरे’, ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकांमधून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
-
‘अनन्या’ या नाटकातील ऋतुजाने साकारलेली दिव्यांग मुलीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
-
करिअरप्रमाणेच ऋतुजाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातही एक पाऊल पुढे टाकलं आहे. नुकतंच तिने स्वत:चं नवीन घर खरेदी केलं आहे.
-
ऋतुजाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिच्या घराचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
फोटो शेअर करत ऋतुजाने “स्वतःचं घर. हॅप्पी बर्थडे टू मी. मी माझ्या घराला दिलेली ही पहिली भेट”, असं म्हटलं आहे.
-
पुढे ती म्हणते, “जेव्हा लोक विचारतात की, वय झालंय लग्न कधी करणार? तेव्हा माझी आई म्हणाली, वय झालं म्हणून नाही तुला जेव्हा करावसं वाटेल तेव्हा लग्न कर. पण त्याआधी स्वावलंबी हो, स्वतःचं घर घे”.
-
“आई हे स्वप्न तू मला दाखवलं त्याबद्दल तुझे खूप आभार. मला माहीत असलेली तू सर्वात कणखर व्यक्ती आहेस. बाबा तुमच्याशिवाय हे शक्य झालं नसतं. आईने स्वप्न दाखवलं पण तुम्ही पाठीशी होतात म्हणून ही उडी घेतली”.
-
“भौतिक गोष्टींमध्ये मी यश किंवा समाधान शोधत नाही. पण तुमचं स्वप्न पूर्ण करु शकले हयाचा आनंद मी शब्दात मांडू शकत नाही. तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमानाने पाणावलेल्या डोळ्यांनी मला आणखी कष्ट करण्याची ताकद दिली आहे”.
-
ऋतुजाच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (सर्व फोटो : ऋतुजा बागवे/ इन्स्टाग्राम)
Photos : ऋतुजा बागवेने खरेदी केलं नवं घर, फोटो शेअर करत म्हणाली “स्वत:चं घर…”
करिअरप्रमाणेच ऋतुजाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातही एक पाऊल पुढे टाकलं आहे. नुकतंच तिने स्वत:चं नवं घर खरेदी केलं आहे.
Web Title: Marathi actress rutuja bagwe buy new home photos seeking attention on internet kak