• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. famous marathi serial movie fame actress may enter in bigg boss house instagram story viral nrp

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ‘बिग बॉस मराठी’त सहभागी होणार? इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चांना उधाण

यापाठोपाठ आता आणखी एका मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रीचे नाव बिग बॉस स्पर्धकांच्या यादीत घेतलं जात आहे.

Updated: September 12, 2022 21:00 IST
Follow Us
  • bigg-boss-marathi-३
    1/20

    छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे.

  • 2/20

    ‘बिग बॉस मराठी’चे तीनही पर्व चांगलेच गाजले होते. बिग बॉसच्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच लोकप्रिय म्हणून ओळखला जातो.

  • 3/20

    बिग बॉसचे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • 4/20

    येत्या २ ऑक्टोबरपासून हा कार्यक्रम सुरु होणार आहे. नुकतंच एका नव्या टीझरद्वारे याबाबतची माहिती समोर आली आहे.

  • 5/20

    त्यानंतर आता बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचे स्पर्धकांची नाव समोर येण्यास सुरुवात झाली आहे.

  • 6/20

    गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातील विविध स्पर्धकांची संभाव्य यादी समोर आली होती.

  • 7/20

    बिग बॉसच्या या पर्वात प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणजेच हार्दिक जोशी सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे.

  • 8/20

    त्यानंतर अभिनेते किरण माने यांचे नावही बिग बॉसच्या स्पर्धकांमध्ये घेतलं जात आहे.

  • 9/20

    यापाठोपाठ आता आणखी एका मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रीचे नाव बिग बॉस स्पर्धकांच्या यादीत घेतलं जात आहे.

  • 10/20

    लाखो तरुणांच्या मनाला भुरळ घालणारी अभिनेत्री सायली संजीव ही बिग बॉसमध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे.

  • 11/20

    तिच्या एका इन्स्टाग्राम स्टोरीमुळे या चर्चांना उधाण आले आहे.

  • 12/20

    अभिनेत्री सायली संजीव हिने नुकतीच एक इन्टाग्राम स्टोरी शेअर केली होती.

  • 13/20

    या स्टोरीमुळे ती बिग बॉस मराठी मध्ये सामील होणार हा असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

  • 14/20

    यात तिने तिचा एक फोटो शेअर केला होता.

  • 15/20

    त्याला कॅप्शन देताना ती म्हणाली, “येत्या १ ऑक्टोबरपर्यंत नेटवर्क नसलेल्या ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे. तेव्हा लवकरच भेटू.”

  • 16/20

    तिच्या हा फोटो आणि कॅप्शन सध्या व्हायरल होत आहे.

  • 17/20

    येत्या २ ऑक्टोबरपासून बिग बॉस मराठी सुरु होत आहे.

  • 18/20

    त्यामुळे सायली बिग बॉसच्या घरात दिसणार असा अंदाज अनेकांनी बांधला जात आहे.

  • 19/20

    काही दिवसांपूर्वीच यंदा बिग बॉसचे चौथे पर्व कोण होस्ट करणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

  • 20/20

    महेश मांजरेकर हेच बिग बॉसचे चौथे पर्वही होस्ट करणार आहेत, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे बिग बॉसच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

  • 21/20

    फोटो – सायली संजीव/ इन्स्टाग्राम

TOPICS
बिग बॉस मराठीBigg Boss MarathiमनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Famous marathi serial movie fame actress may enter in bigg boss house instagram story viral nrp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.