-
अभिनेत्री प्रार्थना बेहरे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमुळे चर्चेत आहे.
-
या मालिकेमध्ये प्रार्थनाने साकारलेलं नेहा हे पात्र घराघरांत पोहोचलं.
-
तिचा या मालिकेमधील पारंपरिक लूक तर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला.
-
‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये प्रार्थनाच्या पारंपरिक लूकची आजही क्रेझ कायम आहे.
-
या मालिकेमध्ये तिचं लग्न झाल्यानंतर प्रार्थनाने परिधान केलेलं मंगळसुत्र विशेष लक्षवेधी ठरलं होतं.
-
आता प्रार्थनाचं नवं फोटोशूट चर्चेत आलं आहे.
-
या फोटोंमध्ये तिने पारंपरिक साडी परिधान केली असल्याचं दिसत आहे.
-
तिच्या या मोहक लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
पण त्याचबरोबरीने तिने परिधान केलेलं मंगळसुत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
-
काळे मणी, डायमण्ड पेंडन्ट अशी या मंगळीसुत्राची डिझाइन आहे.
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : प्रार्थना बेहरेच्या मंगळसूत्राची हटके स्टाइल, नव्या डिझाइनची सोशल मीडियावर चर्चा
अभिनेत्री प्रार्थना बेहरेच्या मंगळसुत्राची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत आहे.
Web Title: Mazhi tuzhi reshimgath zee marathi serial actor prarthana behere mangalsutra design photos viral on social media kmd