-
हिंदी चित्रपटसृष्टीतला सध्याचा सर्वात लोकप्रिय आणि आपल्या भूमिकांसाठी लोकांच्या लक्षात राहणारा अभिनेता म्हणजे आयुष्मान खुराना.
-
आज आयुष्मानचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्याच्याविषयी काही खास गोष्टी आपण जाणून घेऊयात.
-
आयुष्मानचे वडील हे ज्योतिषी आहेत तंर आई हाऊसवाईफ आहे. आयुष्मानचा भाऊ अपारशक्ति खुरानासुद्धा अभिनेता आहे.
-
पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असताना त्याने नाटकात काम करायला सुरुवात केली.
-
आयुष्मानने त्याच्या कारकीर्दीची सुरुवात एम टीव्हीच्या ‘रोडीज’ या रीयालिटि शो मधून केली. शिवाय या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाचा तो विजेतादेखील होता.
-
व्हिडिओ जॉकी ते गायक आणि अभिनेता आयुष्मानचा हा प्रवास खडतर होता.
-
त्याच्या या खडतर काळात आयुष्मान चक्क ट्रेनमध्येसुद्धा गाणं गायचा.
-
पश्चिम एक्सप्रेस किंवा पंजाब मेलमधून आयुष्मान त्याच्या मित्रांबरोबर मुंबईत यायचा तेव्हा तो बऱ्याचदा ट्रेनमध्ये गाणी गायचा आणि लोकं त्याला खुश होऊन बक्षीस म्हणून पैसे देत असत. हा किस्सा त्याने कपिल शर्माच्या कार्यक्रमात सांगितला.
-
ट्रेनमध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी हौस म्हणून गाणी गाणारा आयुष्मान आज एका चित्रपटासाठी १० कोटी इतकं मानधन घेतो.
-
शुजित सरकारच्या ‘विकी डोनर’ या चित्रपटातून आयुष्मानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
या चित्रपटासाठी त्याला बरेच पुरस्कार मिळाले आणि लोकांनी त्याच्या कामाची प्रशंसा केली.
-
‘अंधाधून’, ‘बधाई दो’, ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटांना मिळालेल्या घवघवीत यशामुळे आयुष्मानचं नाव घराघरात पोहोचलं.
-
‘आर्टिकल १५’ या चित्रपटात त्याने वेगळी आणि गंभीर भूमिका साकारली. त्याचा नुकताच आलेला ‘अनेक’ हा चित्रपट फारसा चालला नसला तरी त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी त्याचे चाहते फार आतुरतेने वाट पाहतायत. (फोटो सौजन्य : आयुष्मान खुराना / फेसबुक)
Photos : ट्रेनमध्ये गाणं गाणारा सामान्य मुलगा ते बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता…जाणून घ्या आयुष्मानच्या प्रवासाबद्दल
अभिनेता आयुष्मान खुरानाच्या प्रवासाविषयी जाणून घ्या.
Web Title: From singing in trains to bollywoods most popular actor ayushmann khurrana struggle story avn