• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. exit of these celebrities from famous shows gave shocked to audience rnv

उत्तम प्रतिसाद मिळणाऱ्या कलाकृतीतून ‘या’ कलाकारांनी अचानक घेतलेली एक्सिट ठरला चर्चेचा विषय

गेल्या काही वर्षात अनेक कलाकारांनी उत्तम प्रतिसाद मिळणाऱ्या कलाकृतींमधून अचानक एक्सिट घेतली आहे.

September 16, 2022 20:06 IST
Follow Us
  • exit-11
    1/12

    मालिकांच्या माध्यमातून भेटीला येणारे कलाकार ही प्रेक्षकांच्या घरातलेच होऊन जातात. पण गेल्या काही वर्षात अनेक कलाकारांनी उत्तम प्रतिसाद मिळणाऱ्या मालिकांमधून एक्सिट घेतली आहे.

  • 2/12

    जे मालिकांच्या बाबतीत झालं तेच काही नाटकांच्या बाबतीतही झालं. बघूया कोणत्या कलाकारांनी नाटक आणि मालिकांमधून अचानक बाहेर पडण्याचा निर्णय चर्चेचा विषय ठरला.

  • 3/12

    अभिनेत्री विशाखा सुभेदार गेली काही वर्ष ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम करत होती. विशाखा – समीर चौगुले या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. पण गेल्या महिन्यात अचानक तिने या कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा तिचा निर्णय जाहीर केला.

  • 4/12

    ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेतून मध्यंतरी हेमांगीने अचानक एक्सिट घेतली. तिने हा निर्णय का घेतला याचा तिने खुलासा केलेला नाही.

  • 5/12

    अभिनेत्री उर्मिला कोठारे ही ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर आली होती. पण काही भागानंतर या मालिकेत तिच्या पात्राचा मृत्यू झालेला दाखवला आणि त्यानंतर ती या मालिकेत दिसलीच नाही.

  • 6/12

    मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी यांची ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मालिका तुफान लोकप्रिय झाली. या मालिकेत अभिनेते सुरुवातीला मोहन जोशी स्वप्नीलच्या वडिलांची भूमिका साकारत होते. पण काही भागानंतर त्यांनी या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांची जागा अभिनेते विवेक लागू यांनी घेतली.

  • 7/12

    अभिनेत्री स्पृहा जोशीच्या मालिका जितक्या गाजल्या तितकाच उत्कृष्ट प्रतिसाद तिच्या नाटकांनाही मिळाला. चिन्मय मंडळेकर दिग्दर्शित ‘समुद्र’ या नाटकात ती चिन्मय मांडलेकरबरोबर काम करत होती. पण काही महिन्यात अचानक ती या नाटकातून बाहेर पडली. तिने अचानक असा निर्णय का घेतला, असा प्रश्न अनेकांनी तिला विचारला. पण तिने याचे कारण कोणालाही सांगितले नाही.

  • 8/12

    अभिनेता अजय पुरकर ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका सकारायचा. परंतु इतर प्रोजेक्ट्सच्या शूटिंगमुळे त्याने या मालिकेत काम न करण्याचा निर्णय घेत मालिकेतून एक्सिट घेतली.

  • 9/12

    ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय मालिका आहे. त्यात अभिनेत्री अदिती द्रविड हीदेखील काम करायची. पण नुकतीच तिने या मालिकेत काम करणे थांबवले असल्याची माहिती चाहत्यांना दिली.

  • 10/12

    स्नेहालता माघाडे ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत नेत्रा ही पात्र साकारायची. पण अचानक तिने या मालिकेतून काढता पाय घेतला.

  • 11/12

    अभिनेता वैभव मांगले गेले काही वर्षं ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकात चेटकीणीची भूमिका साकारत होता. त्याची ही भूमिका लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडायची. पण आज त्याने ही भूमिका करणे सोडल्याचे सोशल मीडियावरून जाहीर केले.

  • 12/12

    अभिनेत्री वरदा पाटील ही ‘लेक माझी दुर्गा’ मालिकेत दुर्गा ही भूमिका सकारायची. परंतु या मालिकेत नवा ट्विस्ट दाखवण्यात आला आणि वरदाची मालिकेतून एक्सिट झाली.

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी चित्रपटMarathi Movieमराठी ड्रामाMarathi Dramaमराठी फिल्मMarathi Filmमराठी बातम्याMarathi Newsमराठी सिनेमाMarathi Cinema

Web Title: Exit of these celebrities from famous shows gave shocked to audience rnv

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.