-
संदीपा धार ही सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.
-
कश्मीरच्या श्रीनगरमध्ये संदीपाचा जन्म झाला, कॉलेजनंतर नंतर तिने जाहिराती क्षेत्रात करियर करायचं ठरवलं आणि मग हळूहळू मॉडेलिंगही तिने सुरू केलं.
-
राजश्री प्रोडक्शनच्या ‘इन दिस लाईफ’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
-
नुकतंच तिने आकाशी रंगाच्या साडीतील फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले.
-
तिचा हा साडीतला लूक फारच व्हायरल झाला आहे.
-
या साडीत ती फार मोहक, आकर्षक आणि बोल्ड दिसत आहे.
-
संदीपा तिच्या या ग्लॅमरस आणि हॉट लूकसाठी कायम चर्चेत असते.
-
संदीपा ही भरतनाट्यम या नृत्यकलेत पारंगत आहे.
-
सोशल मीडियावर तिचे कित्येक डान्स व्हिडिओज व्हायरल झाले आहेत.
-
याबरोबरच ती पाश्चिमात्य नृत्यप्रकारातदेखील तितकीच पारंगत आहे.
-
‘दबंग २’ आणि ‘कागज’सारख्या चित्रपटातून तिने सलमान खान, पंकज त्रिपाठीसारख्या अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे.
-
याबरोबरच संदीपा काही वेबसीरिजमध्येही छोट्या भूमिकेत झळकली आहे. (फोटो सौजन्य : संदीपा धार / इन्स्टाग्राम)
Photos : बोल्ड लूकसाठी कायम चर्चेत असणाऱ्या संदीपा धारचा साडीतला हटके लूकही होतोय प्रचंड व्हायरल
संदीपा ही अभिनयाबरोबरच उत्तम नृत्यकलेतही पारंगत आहे.
Web Title: Hindi bollywood actress sandeepa dhar new bold saree look viral on instagram avn