• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. do you know thw real name of sairat movie fame actress rinku rajguru photos kak

Photos : ‘सैराट’मधील आर्चीचं खरं नाव माहीत आहे का?, रिंकू नाही तर…

‘सैराट’ फेम आर्चीला तिचे आई-बाबा लाडाने ‘रिंकू’ म्हणतात.

Updated: September 24, 2022 16:53 IST
Follow Us
  • do you know the real name of sairat movie fame actress rinku rajguru
    1/15

    २०१६ साली प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या चित्रपटातील गाणीही हिट झाली होती.

  • 2/15

    याच चित्रपटातून अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरूने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.

  • 3/15

    ‘सैराट’मुळे रिंकू प्रसिद्धीझोतात आली होती. या चित्रपटामुळे तिने यशाचं शिखर गाठलं होतं.

  • 4/15

    त्यानंतर रिंकूने मागे वळून पाहिलं नाही. ‘झुंड’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून तिने अभिनयाद्वारे प्रेक्षकांवर छाप पाडली.

  • 5/15

    ‘हण्ड्रेड’ या वेब सीरिजमधून तिने ओटीटवर पदार्पण केलं. या सीरिजमध्ये तिने बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्तासह स्क्रीन शेअर केली होती.

  • 6/15

    रिंकूचा चाहता वर्ग किती मोठा आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. ‘सैराट’मधील परश्याचा आर्चीने अनेकांच्या हृद्याचा ठोका चुकवला आहे.

  • 7/15

    रिंकू सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती तिचे फोटो शेअर करत असते.

  • 8/15

    ‘सैराट’ फेम आर्चीला सगळे रिंकू नावाने ओळखत असले, तरी तिचं खरं नाव वेगळं आहे.

  • 9/15

    नुकतंच रिंकूने झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमातील सगळ्याच प्रश्नांना तिने मजेशीर पद्धतीने उत्तर दिली.

  • 10/15

    रिंकूने कार्यक्रमात तिच्या खऱ्या नावाबद्दलही उलगडा केला. रिंकू हे तिचं खरं नाव नसून तिचे आई-बाबा लाडाने तिला ‘रिंकू’ म्हणतात.

  • 11/15

    तिचं खरं नाव ‘प्रेरणा’ असं आहे. प्रेरणा महादेव राजगुरू असं तिचं पूर्ण नाव आहे.

  • 12/15

    रिंकूच्या दहावी आणि बारावीच्या मार्कशीटवरही हेच नाव आहे.

  • 13/15

    परंतु, ती सोशल मीडियावर रिंकू राजगुरू असं नाव लिहिते आणि त्याच नावाने ओळखलीही जाते.

  • 14/15

    (सर्व फोटो : रिंकू राजगुरू/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा >> Photos : ब्रालेट टॉप आणि साडीत अक्षयाच्या कातिल अदा; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल ‘सुंदरा मनामध्ये भरली’)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsरिंकू राजगुरूRinku Rajguru

Web Title: Do you know thw real name of sairat movie fame actress rinku rajguru photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.