-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम म्हटलं की कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो.
-
नम्रता एकापेक्षा एक सुंदर पात्र या कार्यक्रमाध्ये साकारताना दिसते.
-
अभिनेत्री म्हणून कलाक्षेत्रामध्ये तिने स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.
-
तिच्या विनोदी शैलीचे लाखो चाहते आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या पर्वातही ती तितकीच धमाल करते.
-
नम्रता सोशल मीडियावरही फार सक्रिय असते.
-
तिचे विविध व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात.
-
आताही तिने नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिचा तुम्ही कधीही न पाहिलेला लूक पाहू शकता.
-
एका कपड्यांच्या ब्रँडसाठी तिने हे खास फोटोशूट केलं आहे.
-
लाल रंगाची साडी, हिरव्या रंगाचा ब्लाऊज, नाकात नथ असा नम्रताचा लूक अगदी थक्क करणारा आहे.
-
नम्रताने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा मराठमोळा लूक पाहून चाहतेही फिदा झाले आहेत.
-
सुंदर दिसत आहेस, एकमद भारी अशा अनेक कमेंट नम्रताच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच तिच्या लूकचंही कौतुक केलं आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Photos : कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, पारंपरिक साडी; नम्रता संभेरावचा रॉयल कारभार, खास लूक पाहिलात का?
अभिनेत्री नम्रता संभेरावचं मराठमोळ्या लूकमधील फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या या पारंपरिक लूकवर आपण एक नजर टाकणार आहोत.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fem actress namrata sambherao navratri special photoshoot in maharashtrian look see pic kmd