-
प्रियंका चोप्राचे न्यू यॉर्कमध्ये ‘सोना’ नावाचे रेस्टॉरंट आहे. चित्रपटांप्रमाणेच या रेस्टॉरंटच्या कारभारतही तिचं नेहमी लक्ष असतं. -
नयनताराचे ‘राऊडी पिक्चर्स’ नावाचे प्रोडक्शन हाऊस आहे. त्यासोबतच ती रेस्टॉरंट आणि कॉस्मेटिक कंपनीचीही मालकीण आहे.
-
रकुल प्रीत सिंगला तिच्या फिटनेससाठी खास ओळख आहे. रकुल प्रीतची ‘एफ-४५ फिटनेस हेल्थ क्लब’ नावाची स्वतःची जिम आहे.
-
सुश्मिता सेनचा दुबईत एक ज्वेलरी ब्रॅंड आहे. तसंच ‘तंत्रा एंटररटेनमेंट’ नावाची तीची भारतात इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीही आहे.
-
ट्विंकल खन्ना ही एका ईंटीरियर डिझाईनिंग कंपनीची मालकीण आहे.
-
तापसी पन्नू तिची बहीण आणि एका मैत्रिणीसोबत ‘द वेडिंग फॅक्टरी’ ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवते.
-
समांथा प्रभू ‘साकी’ नावाचा कपड्यांचा ब्रँड चालवते आणि तिने अनेक स्टार्टअप्समध्येही गुंतवणूक केली आहे.
-
श्रिया सरनचे मुंबईत स्वतःचे वेलनेस सेंटर आणि स्पा आहे. काही अपंग लोक त्यांना एकत्र चालवतात.
-
काजल अग्रवालने तिच्या बहिणीसोबत ‘मर्सला’ नावाचा ज्वेलरी ब्रँड सुरू केला आहे. चित्रपटांप्रमाणेच ती या व्यवसायातही यशस्वी ठरली आहे.
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री आहेत यशस्वी उद्योजिका, सांभाळतात ‘हे’ व्यवसाय
मनोरंजनसृष्टीत अनेक अभिनेत्री आहेत ज्या अभिनयाव्यतिरिक्त इतर व्यवसायही यशस्वीरित्या सांभाळतात. या व्यवसायातून त्या मोठी रक्कमही कामावतात.
Web Title: These indian actresses are successful businesswoman rnv