-
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही गेले काही दिवस खूपच चर्चेत आहे. याचे कारण तिचे चित्रपट नसून सुकेश चंद्रशेखरचा 200 कोटींचा घोटाळा हे आहे. या प्रकरणार जॅकलिनचेही नाव आले होते.
-
आता जॅकलिनचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात तिच्या आलिशान घराची झलक दिसली.
-
गौरी खानच्या ‘ड्रीम होम’ या शोच्या नव्या भागात जॅकलिन सहभागी झाली होती, त्याचा हा प्रोमो आहे.
-
त्यात गौरी खान जॅकलिनच्या घरी जाऊन तिच्या आवडीनिवडी जाणून घेताना दिसतेय. तसेच त्यांच्या मागे संपूर्ण भिंतभर काही हटके वस्तू आणि पुस्तकं ठेवलेली दिसत आहेत.
-
तसेच जॅकलिनच्या एका बेडरुमची झलकही यात दाखवण्यात आली आहे. खूप प्रशस्त अशी ही बेडरूम आहे.
-
पांढऱ्या शुभ्र रंगाचे इंटीरिअर असलेली ही खोली पाहून गौरी खान मोहित झाली.
-
तिला जॅकलिनचे घर प्रचंड आवडले असून आता गौरी तिच्या घराचे इंटीरिअर करणार आहे.
-
याआधी गौरी खानने मनिष मल्होत्रा, कबीर खान यांचीही घरं डिझाइन केली आहेत.
-
त्यानंतर आता गौरी खान जॅकलिन फर्नांडिसच्या घराचे इंटीरिअर डिझाइन करत आहे.
जॅकलिन फर्नांडिसच्या घरावर गौरी खान फिदा, पहा Inside Photos
गौरी खान जॅकलिन फर्नांडिसच्या घराचे इंटीरिअर डिझाइन करत आहे.
Web Title: Gauri khan will be doing interior of jacqueline fernandez house rnv