Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. some unknown and rare facts about first hindi pathbreaking film tumbbad avn

Photos : केवळ ५ कोटींचे बजेट असलेला ‘तुंबाड’ कसा घडला?

वयाच्या केवळ १८ व्या वर्षी राही बर्वे यांनी ‘तुंबाड’ची कथा लिहिली होती.

October 12, 2022 17:30 IST
Follow Us
  • tumbbad 1
    1/18

    १२ ऑक्टोबर २०१८ साली भारतीय चित्रपटसृष्टीचे मापदंड मोडीत काढणारा ‘तुंबाड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, आणि केवळ माउथ पब्लिसिटीच्या आधाराने या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला.

  • 2/18

    सुरुवातीला या चित्रपटाकडे कुणी गांभीर्याने बघत नव्हतं, पण हा चित्रपट बघून जसजसे लोकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली तसा हा चित्रपट मोठा होत गेला.

  • 3/18

    आज याच चित्रपटाशी संबंधीत काही माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेऊयात.

  • 4/18

    दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांचा हा चित्रपट २०१५ सालीच तयार झाला होता, पण त्यातले स्पेशल इफेक्ट आणि इतर नवीन बदल करण्यासाठी त्यांना पुढची ३ वर्षं लागली.

  • 5/18

    या चित्रपटातील लोकेशन्स शोधण्यासाठी सुद्धा चित्रपटाच्या टीमला प्रचंड मेहनत घ्यावी लागली.

  • 6/18

    तो भकास वाडा, ती गुहा जिथे आजवर मनुष्य कधीच फिरकला नव्हता अशा जागा राही यांनी शोधून काढल्या.

  • 7/18

    हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ६ वर्षं ह्या कलाकारांनी मेहनत घेतली.

  • 8/18

    २०१८ च्या व्हेनीस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट सादर करण्यात आला होता.

  • 9/18

    तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या चित्रपटाचा शेवटचा सीन केवळ एका कंदीलाच्या प्रकाशात शूट केला गेला आहे.

  • 10/18

    तब्बल ६ वर्षं अभिनेता आणि निर्माता सोहम शहा याला ८ किलो वाढवलेलं वजन कायम ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागायची.

  • 11/18

    चित्रपटात बरीचशी दृश्यं ही पावसातील आहे. चित्रपटाच्या टीमला शूटिंगच्यावेळी पावसाची तासंतास वाट बघत बसावं लागायचं. सलग ४ पावसाळे यासाठी सगळ्यांनी मेहनत घेतली होती.

  • 12/18

    ‘तुंबाड’ ही कथा सर्वप्रथम ३ भागात सादर केली जाणार होती, ज्याच्या शेवट फार वेगळा होता, पण नंतर यात बदल करण्यात आले.

  • 13/18

    अभिनेता मोहम्मद समद ज्याने सोहम यांच्या मुलाची भूमिका केली आहे त्यानेच चित्रपटातील भयानक आजीबाईची भूमिकादेखील केली आहे.

  • 14/18

    वयाच्या केवळ १८ व्या वर्षी राही बर्वे यांनी ‘तुंबाड’ची कथा लिहिली होती.

  • 15/18

    या कथेसाठी राही यांनी कित्येक निर्माते दिग्दर्शकांचे उबरठे झिजवले, पण कुणीच तयांच्या या प्रोजेक्टमध्ये पैसे टाकायला तयार नव्हतं.

  • 16/18

    २००८ साली जेव्हा चित्रपटासाठी निर्माता मिळाला तेव्हा यामध्ये प्रमुख भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकीला घेतलं होतं, नंतर निर्मात्यांनी अंग काढून घेतल्यावर तोही निर्णय बदलण्यात आला.

  • 17/18

    भारतीय चित्रपटाच्या इतिहासात काहीतरी वेगळी कलाकृती सादर करून ती यशस्वी करून दाखवणाऱ्या ‘तुंबाड’च्या पुढील भागाची आजही प्रेक्षक वाट पाहत आहेत. त्या वाड्याचे दार पुन्हा उघडेल अशी लोकांना आशा आहे.

  • 18/18

    जेव्हा या चित्रपटाची चर्चा झाली तेव्हा बॉलिवूडमधीलही दिग्गज मंडळींनी याची दखल घेत राही बर्वेचं कौतुक केलं. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस आणि फेसबुक)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Some unknown and rare facts about first hindi pathbreaking film tumbbad avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.